सांगली येथे पी.एफ्.आय. या संघटनेच्या विरोधात कारवाई करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांची निदर्शने ! 

स्टेशन चौकातील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासमोर भाजप, शिवसेना, हिंदु एकता आंदोलन, बजरंग दल, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान अशा हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २७ सप्टेंबर या दिवशी पी.एफ्.आय.च्या विरोधात निदर्शने करण्यात आली.

(म्हणे) ‘आता प्रत्येक मुसलमान तरुणाला अटक केली जाईल !’ – असुदुद्दीन ओवैसी

हे विधान म्हणजे मुसलमानांना चिथावण्याचाच भाग नव्हे का ? ‘पी.एफ्.आय’चे समर्थन करणार्‍या अशांवरही सरकारने कारवाई केली पाहिजे !

‘पी.एफ.आय.’च्या वेबसाइट आणि सोशल मीडिया खाती यांवर बंदीचे आदेश

या संघटनांचा अवैध अपप्रचार रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे, असे अधिकृत सूत्रांनी सांगितले.

‘पीएफआय’वर बंदी हा अंतर्गत आतंकवादावर ‘सर्जिकल स्ट्राइक’ ! – श्री. चेतन राजहंस, राष्ट्रीय प्रवक्ते, सनातन संस्था

सनातन संस्थेने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, ‘पी.एफ्.आय.’वरील बंदी, ही ‘गझवा-ए-हिंद’ अर्थात् भारताला ‘इस्लामिक स्टेट’ बनवण्याची स्वप्ने बाळगणार्‍या जिहादी प्रवृत्तींना चपराक आहे.

(म्हणे) ‘रा.स्व. संघावरही बंदी घाला !’ – काँग्रेससह विरोधी पक्षांची मागणी

रा.स्व. संघाने असे कोणते देशविघातक कृत्य केले ज्यामुळे त्याच्यावर बंदी घातली पाहिजे, हे विरोधी पक्षांनी सांगितले पाहिजे.

केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांच्या हानीभरपाईसाठी उच्च न्यायालयात याचिका

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ने (‘पी.एफ.आय.’ने) गेल्या २३ सप्टेंबरला पुकारलेल्या बंदच्या वेळी अनेक बसगाड्यांची तोडफोड केली. या हिंसाचारात केरळ राज्य मार्ग परिवहन महामंडळाची ५ कोटी रुपयांची हानी झाली.

‘पी.एफ्.आय.’ वरील बंदीचे सुफी आणि बरेलवी मौलवींकडून स्वागत

‘पी.एफ्.आय.’वर बंदी घातल्यानंतर विरोधी पक्षांकडून रा.स्व. संघावर बंदी घालण्याची मागणी केली जात असतांना दुसरीकडे मुसलमानांच्या काही संघटनांनी बंदीचे स्वागत केले आहे. सुफी आणि बरेलवी मौलवींनी बंदीचे स्वागत केले आहे.

‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’वर ५ वर्षांसाठी बंदी !

जिहादी आतंकवादी संघटनांशी संबंध असल्यावरून ‘यु.ए.पी.ए.’ कायद्यांतर्गत कारवाई

(म्हणे), ‘पुरावे असतील तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका !’ – इम्तियाज जलील, खासदार

‘देशात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या (पी.एफ्.आय.) विरुद्ध कारवाईचे सत्र चालूच आहे. ए.टी.एस्. त्यांचे काम करत आहे. पुरावे असतील, तर चौकशी करा; पण विनाकारण त्रास देऊ नका, अशी प्रतिक्रिया ‘एम्.आय.एम्’चे खासदार इम्तियाज जलील यांनी २७ सप्टेंबर या दिवशी येथे दिली.

पी.एफ्.आय.’च्या सदस्यांना शोधा आणि झोडा ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

देशविरोधी कार्य करणार्‍या पी.एफ्.आय. संघटनेवर केंद्र सरकारने कारवाई केली असून राज्य सरकारही कारवाई करत आहे. या संघटनेच्या सदस्यांना जिथे असतील तेथून शोधून झोडून काढावे.