
पुणे – नवीन इमारतीतील वीजमीटर जोडणीसाठी ठेकेदाराकडून लाचेची मागणी करणारे अतिरिक्त कार्यकारी अभियंता रामचंद्र नारायण लोंढे यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ४ जून या दिवशी अटक केली. तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार प्रविष्ट केली होती.
१. तक्रारदार हे ठेकेदार असून ते ‘महावितरण’ची कामे करतात. ‘महावितरण’ उपविभाग २ हडपसर अंतर्गत नवीन १२ वीजमीटर जोडणीचे काम केले.
२. या कामाच्या मोबदल्यात प्रतिमीटर १२ सहस्र रुपयांची मागणी लोंढे यांनी केली होती, तसेच एका नवीन इमारतीच्या कामासाठी ५० सहस्र रुपयांचीही मागणी केली.
३. आरोपी लोंढे यांनी १२ सहस्र रुपयांपैकी ४ सहस्र ५०० रुपये यापूर्वीच स्वीकारल्याचे मान्य केले. उर्वरित ७ सहस्र ५०० रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
सासवड-जेजुरी मार्गावर वारकर्यांच्या दिंडीत ट्रक घुसून झालेल्या अपघातात ३ महिला वारकर्यांचा मृत्यू !
पोलिसांनी १५ दिवसांमध्ये आरोपपत्र प्रविष्ट करून जलदगती न्यायालयात खटला चालवावा ! – आमदार गोपीचंद पडळकर
पुणे शहरात वारीमध्ये ८ सहस्रांहून अधिक पोलीस कर्मचारी असतांना चोरीच्या ११ घटनांची नोंद !
पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांची ‘लेट्सअप न्यूज पोर्टल’कडून मानहानी
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांकडून स्वागत !
वारकर्यांसाठी ‘मोबाईल चार्जिंग’ची सुविधा !