
पिंपरी-चिंचवड – येथील श्री मोरया गोसावी मंदिर परिसरातील यात्रेत ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तूंच्या विक्रीचा दावा करणारा व्हिडिओ प्रसारित झाला आहे. या मंदिर परिसरात संकष्टी चतुर्थीनिमित्त भरलेल्या यात्रेत एका महिलेने खरेदी केलेल्या चादरीवर ‘मेड इन पाकिस्तान’ (पाकिस्तानात उत्पादित) हे लेबल आढळल्याचे महिलेने म्हटले आहे. ‘मी काही सीमेवर वगैरे रहात नाही, सीमेपासून सहस्रो कि.मी. दूर रहाते, महाराष्ट्रात, पुण्याजवळ ! तरी आपल्या इथे अशी ‘मेड इन पाकिस्तान’ वस्तू मिळावी ? हे पाहून माझा अगदी संताप होतो आहे’, असे म्हणत त्या महिलेने तिचा राग व्यक्त केला.
या संदर्भातील व्हिडिओ सध्या सामाजिक माध्यमावर वेगाने प्रसारित झाला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच महाराष्ट्रातील संभाजीनगर जिल्ह्यात ‘मेड इन पाकिस्तान’ लेबल असलेली सौंदर्यप्रसाधने विकणार्या तिघांना अटक करण्यात आली होती. यामुळे स्थानिक बाजारात परदेशी वस्तूंच्या विक्रीविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
ही चादर नेमकी कुठून आली ? ती अधिकृतपणे आयात झाली होती कि नाही, तसेच विक्रेत्याची बाजू काय आहे ? याविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. पोलिसांनी एक विशेष पथक स्थापन केले असून ही चादर कुठून आली आणि जत्रेत ती कुणी विकली ? याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेला पत्र लिहून अशा दुकानदारांवर कारवाई करण्यास सांगितले आहे.
पंढरपूर येथील श्री विठ्ठल मूर्तीवर रासायनिक लेपन करण्यास वारकरी संप्रदायाचा तीव्र विरोध : रासायनिक लेपनामुळे मूर्तीची हानी !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
नागपूर येथे श्री दुर्गादेवीच्या मूर्तीवरील सोन्याची साखळी चोरणार्या ३ धर्मांधांना अटक !
‘एक भक्कम पाकिस्तान अमेरिकेच्या हितासाठी अत्यंत आवश्यक !’ – अमेरिका
भारतावर दबाव आणणे जागतिक स्थिरतेसाठी अत्यंत घातक ! – Russia President Putin
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !