दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील लहान मुलीच्या मृत्यूचे प्रकरण

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात मुलीवर १८ मे या दिवशी नेत्र शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिचा मृत्यू झाला होता. उपचाराच्या वेळी वैद्यकीय निष्काळजीपणामुळे मुलीचा मृत्यू झाल्याचा आरोप मुलीच्या कुटुंबियांनी करत रुग्णालयावर कारवाईची मागणी केली होती. २२ मेला महापालिकेने स्थापन केलेल्या ५ जणांच्या प्राथमिक चौकशी समितीने १ जूनला अहवाल महापालिकेला सादर केला.
पुढील अन्वेषण हे ससून रुग्णालयाच्या अधीक्षका़च्या देखरेखीखाली करण्यात यावे, अशी शिफारस प्राथमिक चौकशी समितीने केली आहे. शस्त्रक्रियेपूर्वी आवश्यक तपासण्या करण्यात आल्या होत्या का ? शस्त्रक्रियेनंतर उपलब्ध असलेल्या अहवालावरून मुलीला रक्तस्त्रावाशी संबंधित विकार असण्याची शक्यता अहवालात वर्तवण्यात आली. समितीने शस्त्रक्रिया करणार्या डॉक्टरांशी चर्चा केली; पण शवविच्छेदन अहवाल उपलब्ध नसल्याने मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील चौकशी ही ससून रुग्णालयाच्या ५ सदस्यांच्या तज्ञ समितीकडून केली जाणार आहे. या समितीत ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांसह औषधोपचार, नेत्ररोग, बालरोग आणि न्यायवैद्यक विभागाच्या प्रमुखांचा समावेश आहे.
थोडक्यात महत्त्वाचे (०७.०६.२०२६)
संपादकीय : हिंदू जात्यात !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
बांगलादेशी घुसखोरांवर कारवाई करा !