मद्यपी तरुणाचा पोलीस ठाण्यात गदारोळ

पुणे – खडक पोलीस ठाण्यात मद्यपी रोहन गौतम साळवे याने धुडगूस घातला. पोलिसांच्या अंगावर धावून जाणे, सदर्याची कॉलर (गळपट्टी) पकडून मारहाण करणे, लाथाबुक्क्यांनी आक्रमण करणे आणि ‘कोयत्याने फाडून टाकेन, ३०७ चा गुन्हा माझ्यासाठी नवीन नाही’ अशी धमकी दिली. या प्रकरणी खडक पोलीस ठाण्यातील पोलीस शिपाई चंद्रशेखर शरणप्पा हुणचळगी यांनी तक्रार प्रविष्ट केली आहे. आरोपी रोहन यांच्या विरोधात विविध कलमान्वये गुन्हा नोंद केला.
१. आरोपी रोहन हा टिळक रस्त्यावरील ‘जयश्री हॉटेल’समोर रात्री २ वाजता एका महिलेशी वाद घालत होता. भ्रमणभाषवर चित्रीकरण करत होता.
२. पोलिसांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने पोलिसांशी वाद घातला. त्या वेळी त्याने मद्य प्राशन केल्याचे उघडकीस आले.
संपादकीय : हिंदू जात्यात !
पाथर्डी येथे ‘प्रोटीन’ऐवजी गुंगीकारक औषध विकणार्या मुसलमानास अटक !
प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
ससून रुग्णालयातील तज्ञांची चौकशी समिती स्थापन !
मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्यांचे आदेश !
‘महावितरण’च्या लाचखोर अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यास पुणे येथे अटक !