
पंढरपूर – श्री विठ्ठलाची मूर्ती वारकरी संप्रदायासाठी अत्यंत महत्त्वाची असून मूर्तीची वारंवार झीज होत असल्याच्या कारणावरून महापूजा बंद करण्यात आली आहे, तसेच आजपर्यंत ३ वेळा रासायनिक प्रक्रियेद्वारे झीज अल्प करण्याचा प्रयत्न केला गेला; मात्र रासायनिक लेपन कुचकामी असून यामुळे मूर्तीची हानी होत आहे. तरी कोणत्याही परिस्थितीत श्री विठ्ठलाच्या मूर्तीला रासायनिक लेपन करण्यात येऊ नये, अशी ठाम मागणी वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी जिल्हाधिकार्यांच्या समवेत झालेल्या बैठकीत केली. मूर्तीचे जतन-संवर्धन करण्यासाठी वारकरी संप्रदायाची एक समिती स्थापन करावी, ज्याद्वरे देशभरातील तज्ञ मूर्ती अभ्यासक निमंत्रित करावेत. मूर्तीलेपनतज्ञांची मते जाणून घेऊन नंतरच पुढील निर्णय घ्यावा, अशी मागणी त्या बैठकीत करण्यात आली. रासायनिक लेपनास यापूर्वी महाराष्ट्र मंदिर महासंघानेही तीव्र विरोध केला आहे.
(खरे पहाता देवतेच्या मूर्तीवर कोणत्याही प्रकारे रासायनिक लेपन करणे, ही पूर्णत: धर्मशास्त्रविसंगत कृती आहे. मुळापासून उपाययोजना न काढता रासायनिक लेपनासारखी वरवरची उपाययोजना काढल्याने देवतेच्या मूर्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतात, हेही ध्यानात घ्यायला हवे. रासायनिक लेपनास मंदिर महासंघ आणि वारकरी संप्रदाय यांचा तीव्र विरोध असतांनाही प्रशासन वारंवार लेपनाचा का आग्रह धरत आहे ? यापूर्वी ३ वेळा जे लेपन करण्यात आले त्याचा अहवाल मंदिरे समितीने घोषित करावा, तसेच ज्यांनी हे लेपन केले त्याला उत्तरदायी कोण ? हेही घोषित झाले पाहिजे ! – संपादक)
या बैठकीसाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्., मंदिरे समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनाथ औसेकर महाराज, ‘वारकरी पाईक संघा’चे संस्थापक ह.भ.प. देवव्रत (राणा) महाराज वासकर, ह.भ.प. भागवत महाराज शिरवळकर, ह.भ.प. रघुनाथ महाराज कबीर, ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर, ह.भ.प. बापू महाराज उखळीकर यांसह अन्य उपस्थित होते.
या संदर्भात वारकरी संप्रदायाने देवस्थान समितीला एक सविस्तर निवेदन दिले असून या लेपनामुळे कोल्हापूर येतील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीची कशा प्रकारे हानी होत आहे, हे नमूद करण्यात आले आहे. या बैठकीत वारकरी संप्रदायाच्या प्रमुखांनी रासायनिक लेपनास जोरदार आक्षेप घेत कोणत्याही परिस्थिती पदस्पर्श दर्शन बंद ठेवता कामा नये, अशी आग्रही मागणी केली.
आषाढीपूर्वी लेपन करण्याचा प्रयत्न ! – कार्तिकेयन एस्., जिल्हाधिकारी
बैठकीनंतर बोलतांना सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस्. म्हणाले, ‘‘या संदर्भात वारकरी संप्रदायातील प्रमुख मंडळींसमवेत चर्चा करण्यात आली. त्यांच्या मागणीनुसार इपॉक्सी लेपन (रासायिनक लेपन) केले जाणार नसून ‘स्टोन’ पावडरने मूर्तीची झीज भरून काढली जाईल. यासाठी देशभरातील चांगले अभ्यासक, तज्ञ यांना आमंत्रित केले जाणार आहे. पुढील आठवड्यात श्री विठ्ठलाची मूर्ती अभ्यासकांसह महाराज मंडळींना दाखवून निरीक्षण केले जाणार आहे. आषाढीपूर्वी ३ दिवस पदस्पर्श दर्शन बंद ठेवून आणि मुखदर्शन चालू ठेवून मूर्तीचे स्वरूप न पालटता झीज भरून काढण्याची प्रक्रिया केली जाणार आहे.
मध्यप्रदेशातील धार येथील ऐतिहासिक भोजशाळा मंदिरमुक्तीचा लढा !
गोव्यातील मंदिरांवरील ब्राह्मणीकरणाचे आरोप हास्यास्पद !
मंदिरांचे सरकारीकरण टाळण्यासाठी उपाययोजना !
देवभूमीवरील अतिक्रमणाच्या विरोधातील लढाई !
घातक कलमे आणि करावयाचे पालट !
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची विभागीय आयुक्तांकडून पहाणी