
(मजार म्हणजे इस्लामी पीर किंवा फकिर यांचे थडगे)
डेहराडून (उत्तराखंड) – सरकारच्या अतिक्रमणविरोधी मोहिमेच्या अंतर्गत शहरातील अतीमहनीय व्यक्तींसाठीचे क्षेत्र म्हणून ओळखल्या जाणार्या यमुना कॉलनीतील सरकारी भूमीवर उभारलेली एक अनधिकृत मजार ५ मेच्या रात्री उशिरा बुलडोझरद्वारे पाडण्यात आली. हे बांधकाम करणार्यांना एक महिन्यापूर्वी नोटीस पाठवण्यात आली होती; मात्र ती न हटवल्यामुळे प्रशासनाने कारवाई केली.
१. यमुना कॉलनीतील रहिवाशांनी या अनधिकृत मजारीविषयी जिल्हा प्रशासनाकडे यापूर्वी तक्रार केली होती. चौकशीत ती भूमी सरकारी असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने कारवाई चालू केली.
२. जिल्हा दंडाधिकारी डॉ. आशिष चौहान यांच्या आदेशानुसार महानगरपालिका, पाटबंधारे विभाग आणि पोलीस-प्रशासन यांचे संयुक्त पथक रात्री उशिरा घटनास्थळी पोचले. कडक सुरक्षा व्यवस्थेत ही संपूर्ण मोहीम शांततेत पार पडली आणि सरकारी भूमी अतिक्रमणातून मुक्त करण्यात आली.
३. जिल्हाधिकारी प्रत्यूष सिंग यांनी सांगितले की, राज्य सरकारच्या निर्देशानुसार सरकारी भूमीवरील अनधिकृत अतिक्रमणांविरुद्ध सातत्याने मोहीम राबवली जात आहे. त्यांनी नमूद केले की, यमुना कॉलनीतील ज्या ठिकाणी कारवाई करण्यात आली, तिथे कोणतीही धार्मिक चिन्हे किंवा तत्सम साहित्य आढळले नाही.
४. जिल्हाधिकार्यांनी स्पष्ट केले की, सरकारी भूमीवर अतिक्रमण करण्याच्या उद्देशाने उभारलेले कोणतेही अनधिकृत बांधकाम सोडले जाणार नाही. संबंधित व्यक्तींनी स्वतःहून अशी अतिक्रमणे काढून टाकावीत, याला प्रशासनाचे प्राधान्य आहे; अन्यथा नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल.
(म्हणे) ‘श्रीकृष्ण मुसलमान होते आणि ५ वेळा नमाजपठण करायचे !’ – Maulana Jarjis Ansari
हिंदूंच्या तीव्र विरोधानंतर कलाकाराकडून क्षमायाचना !
आतापर्यंतच्या तिन्ही पत्नींचे धर्मांतर केले नाही ! – अभिनेते आमिर खान
हिंदुत्वनिष्ठ सागर बेग यांचे घर बाँबने उडवण्याची पाकमधून धमकी
महिलेच्या छातीला स्पर्श करणे, हा बलात्काराचा प्रयत्न नाही ! – उच्च न्यायालय
Railway Bedsheets Theft : रेल्वेच्या वातानुकूलित डब्यांमधून चादर, ब्लँकेट आणि टॉवेल चोरीला जाण्याच्या घटनांमध्ये वाढ !