‘पी.एफ.आय.’शी संबंधित दोघांना नगरमधून घेतले कह्यात

नगर – पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या इस्लामी संघटनेशी संबंधित असलेल्या येथील दोघांना स्थानिक पोलिसांनी २७ सप्टेंबरला पहाटे ३ वाजता कह्यात घेतले आहे. या कारवाईत केंद्रीय अन्वेषण यंत्रणाही कार्यरत होती. या कारवाईत नगर शहरातून संघटनेशी निगडित असलेला जुबेर सत्तार शेख हा विभागीय अध्यक्ष आणि संगमनेरमधून संघटनेवर सदस्य असलेला महंमद खलील शेख या मौलानाला कह्यात घेण्यात आले आहे.