आतंकवादविरोधी पथकाने ३० सहस्र घुसखोरांची नावे सरकारकडे दिली !
श्री. प्रीतम नाचणकर, विशेष प्रतिनिधी, सनातन प्रभात

मुंबई, ६ जून (वार्ता.) – एकीकडे महाराष्ट्र सरकार मुंबईला ‘आर्थिक आणि तंत्रज्ञान यांचे केंद्र’ (हब) करण्यासाठी प्रयत्नरत आहे. दुसरीकडे मात्र मुंबई बांगलादेशी घुसखोरांचे ‘हब’ (केंद्र) बनले आहे. महाराष्ट्र आतंकवादविरोधी पथकाने नुकतीच ३० सहस्रांहून अधिक बांगलादेशी घुसखोरांची सूची महाराष्ट्र सरकारकडे सुपुर्द केली आहे. ‘सनातन प्रभात’ला ही सूची प्राप्त झाली आहे. यामध्ये मुंबईतील जवळजवळ १ सहस्र ५०० हून अधिक भागांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे आढळले असून केवळ मुंबईत १६-१७ सहस्रांहून अधिक घुसखोर सापडले आहेत. चिंताजनक गोष्ट म्हणजे मुंबईत बांगलादेशी घुसखोर सापडले नाहीत, असे आता एकही ठिकाण राहिलेले नाही. एकंदरीत परिस्थिती पहाता याहून कितीतरी पटींनी अधिक बांगलादेशी घुसखोर मुंबईसह उपनगरांमध्ये सापडण्याची शक्यता आहे.
🚨 Mumbai: A Hub of Bangladeshi Infiltration? 🚨
📍 More than 1,500 bases of Bangladeshi infiltrators reportedly identified in Mumbai
ATS has submitted names of 30,000 infiltrators to the government
BMC initiates cancellation of 19700 suspicious Birth certificates
Raises… pic.twitter.com/f8RO73Ly3Z
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) June 7, 2026
अर्थात मागील २-३ वर्षांत महाराष्ट्रातील महायुतीचे सरकारने बांगलादेशी घुसखोरांविषयी घेतलेली कठोर भूमिका आणि अन्वेषण यंत्रणांनी राबवलेली पकड मोहीम, यांमुळे एवढे तरी बांगलादेशी घुसखोर सापडले आहेत. वर्ष २०२५ मध्ये आतंकवादविरोधी पथकाने १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोरांची सूची सरकारकडे सुपुर्द केली होती. त्यानंतर ही दुसरी सूची देण्यात आली आहे. या वेळच्या सर्व घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात आरोपपत्रही प्रविष्ट (दाखल) करण्यात आले असून कोणत्या शासकीय योजनांचा लाभ हे घुसखोर घेत आहेत का ?, याची पडताळणी करण्यासाठी आतंकवादविरोधी पथकाने ही सूची सरकारकडे पाठवली आहे. या सर्व घुसखोरांना बांगलादेशात पाठवण्याची कार्यवाही चालू आहे.
| आतंकवादविरोधी पथकाने १ सहस्र २३७ बांगलादेशी घुसखोरांची सूची सरकारकडे केली होती सुपुर्द !
|

अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये घुसखोरांचे अड्डे !
मुंबईमधील कामाठीपुरा, कुर्ला, डॉकयार्ड, माझगाव, मालवणी, अंधेरी, नागपाडा, मशीद बंदर, शेवडी, मानखुर्द, जोगेश्वरी, गोवंडी, ग्रँड रोड, अँटॉप हिल आदी सर्व ठिकाणच्या अनधिकृत झोपडपट्ट्यांमध्ये बांगलादेशी घुसखोरांचे अड्डे सापडले आहेत.
आजूबाजूच्या जिल्ह्यांमध्येही घुसखोरांचे बस्तान !
मुंबईच्या व्यतिरिक्त नवी मुंबई, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांतही मोठ्या प्रमाणात बांगलादेशी घुसखोरांनी त्यांचे अड्डे निर्माण केले आहेत. काही बांगलादेशी रेल्वेच्या सीमेत सापडले आहेत. त्यांच्यावर रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे.
गंभीर म्हणजे यांतील बहुतांश बांगलादेशी घुसखोर ५० वर्षे वयोगटाच्या आतील आहेत. मुंबईमध्ये भंगारवाले, फळ-फुल विक्रेते, फास्ट फूड विक्रेते, केशकर्तनालये, फेरीवाले आदी बहुतांश क्षेत्रात या घुसखोरांनी त्यांचा जम बसला असल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे. या कारणामुळे सरकारने मुंबईतील झोपडपट्ट्या, फेरीवाले यांच्यावर कारवाईसाठी धडक मोहीम चालू केली आहे.
घुसखोरांना वसवण्यात काँग्रेस आणि मुसलमान नेते यांचा हात !![]() गंभीर गोष्ट म्हणजे या बांगलादेशी घुसखोरांकडे आधारकार्ड, पॅनकार्ड, रेशनकार्ड, वाहन परवाने एवढेच नव्हे, तर जन्मप्रमाणपत्रेही सापडली आहेत. ही सर्व कागदपत्रे बनावट कागदपत्रांच्या आधारे करण्यात आली आहेत. मागील अनेक वर्षे काँग्रेस सरकारच्या काळात या घुसखोरांच्या विरोधात कारवाई करण्यात आली नाही; उलट या घुसखोरांना स्थानिक मुसलमान नेत्यांनी मुंबईसह आजूबाजूच्या परिसरात वसवण्यासाठी साहाय्य केले. सध्या मुंबईतील अनधिकृत झोपटपट्ट्यांवरील कारवाईमध्ये बांगलादेशी घुसखोरांवर कारवाईला पाठिंबा देण्याऐवजी काही मुसलमान नेते या कारवाईला विरोध करत आहेत. |

डेगवे येथील जिल्हा परिषद शाळेचे छत मध्यरात्री कोसळले : प्रशासनाच्या विरोधात ग्रामस्थांचा संताप
गोव्यातून सुमारे ५ सहस्र वारकर्यांचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान
पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांची चौकशी करू ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
शासनाची सर्व ओळखपत्रे भारतीय नागरिकत्वाचा पुरावा मानावा ! – प्रा. नागनाथ स्वामी, ‘जागृत ग्राहक राजा’ संस्था
जोधपूर (राजस्थान) येथील श्री सच्चियायमातेला श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी केली प्रार्थना !
महाराष्ट्रात आता शासकीय निर्णय, आदेश आदींवर डिजिटल स्वाक्षरी असणार !