नसरापूर येथील बालिका अत्याचार प्रकरण

पुणे – नसरापूर येथील बालिकेवर अत्याचार केल्याच्या प्रकरणाची सुनावणी पुणे येथे विशेष न्यायालयात प्रतिदिन करण्यात येत आहे. आतापर्यंत ३ अल्पवयीन मुलांसह एकूण ३५ साक्षीदारांची साक्ष नोंदवली आहे. सरकार पक्षाने प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, तांत्रिक पुरावे, वैद्यकीय अहवाल आणि डी.एन्.ए. (गुणसूत्र) विश्लेषणासह आरोपी भीमराव कांबळे याच्या विरोधात भक्कम पुरावे न्यायालयात सादर केले. या ३ अल्पवयीन मुलांनी निर्भीडपणे न्यायालयात साक्ष दिली. आरोपी बालिकेला घटनास्थळाकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी पाहिले, तसेच बंद शेडमध्ये पलंगावर तिच्यासोबत बसलेला असल्याचे पाहिल्याचे सांगितले. बालिकेला साहाय्य करण्याच्या उद्देशाने त्यांनी शेडवर दगड मारल्याचेही साक्षीमध्ये नमूद केले आहे.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले