
पंढरपूर – पंढरपूर तालुक्यातील पिराची कुरोली आणि माळशिरस तालुक्यातील बोरगाव, अकलूज येथील जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी तळाची आणि मार्गाची विभागीय आयुक्त शीतल तेली-उगले यांनी पहाणी केली. या वेळी जिल्हाधिकारी कार्तिकेयन् एस्., तहसीलदार सचिन लंगुटे, गटविकास अधिकारी अमोल जाधव, देहू येथील ‘श्री संत तुकाराम महाराज संस्थान’चे विश्वस्त ह.भ.प. उमेश महाराज मोरे यांसह अन्य उपस्थित होते.
या वेळी विभागीय आयुक्त शीतल तेली उगले यांनी सांगितले की, पालखी तळाची स्वच्छता, सपाटीकरण, चिखल होऊ नये; म्हणून मुरूम टाकणे आणि पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी व्यवस्था करावी. वारीकाळात वारकर्यांना मूलभूत आणि आरोग्य सुविधा मिळण्यावर भर देण्यात यावा. पालखीच्या संपूर्ण मार्गावर आणि मुक्कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तात्पुरती अन् फिरती शौचालये उपलब्ध करून स्वच्छतेसाठी मुबलक मनुष्यबळ तैनात ठेवावे, तसेच पालखी तळांवर अग्नीशमन यंत्रणा सुसज्ज ठेवावी.
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !