गोव्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अनेक वर्षांपासून सक्रीय

पणजी – केंद्रशासनाने बंदी घातलेली ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ (‘पी.एफ्.आय.’) गोव्यात अनेक वर्षांपासून देशविघातक कृती किंवा धार्मिक तेढ निर्माण करण्यास सक्रीय आहे. ‘पी.एफ्.आय.’च्या गोव्यातील कारवायांची संक्षिप्त माहिती पुढीलप्रमाणे आहे –

१. ६ डिसेंबरच्या अनुषंगाने बाबरी ढाचाच्या अनुषंगाने ‘पुन्हा बाबरी उभारूया’ या आशयाची धार्मिक तेढ निर्माण करणारी भित्तीपत्रके मडगाव, फोंडा तसेच राज्यातील प्रमुख शहरांत मोक्याच्या ठिकाणी प्रत्येक वर्षी लावत होते. (याविषयी हिंदुत्वनिष्ठांनी तक्रार करूनही गोवा पोलीस त्यांच्यावर कारवाई सोडाच चौकशीही करत नव्हते, हे दुर्दैव ! – संपादक)

२. २९ ऑक्टोबर २०१७ या दिवशी ‘पी.एफ्.आय.’ला मडगाव येथे मोठ्या स्वरूपात एका परिषदेचे आयोजन करायचे होते; मात्र शासनाने यासाठी ‘पी.एफ्.आय.’ला अनुज्ञप्ती नाकारली होती. यानंतर ‘पी.एफ्.आय.’ने ३० ऑक्टोबर २०१७ या दिवशी मडगाव येथे शासनाची अनुज्ञप्ती न घेताच निदर्शने केली होती. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी तत्कालीन पोलीस महासंचालकांची भेट घेऊन अवैधरित्या निदर्शने करणार्‍या ‘पी.एफ्.आय.’वर कारवाई करण्याचे आणि त्यांच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले होते.

३. २२ सप्टेंबर २०२२ या दिवशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने वास्को येथे ‘पी.एफ्.आय.’चा पदाधिकारी अनिस अहमद याच्या निवासस्थानी धाड टाकल्यानंतर ‘पी.एफ्.आय.’च्या पदाधिकार्‍यांनी दुसर्‍या दिवशी मडगाव येथे पत्रकार परिषद घेऊन अन्वेषण यंत्रणेचा निषेध केला होता. ‘पी.एफ्.आय.’च्या गोव्यात ठिकठिकाणी पत्रकार परिषदा वारंवार होत असतात.

‘पी.एफ्.आय.’चा सक्रीय कार्यकर्ता अनिस अहमद हा गेली १० वर्षे बायणा, वास्को येथे वास्तव्यास होता. ‘अनिस अहमद ‘पी.एफ्.आय.’चा सक्रीय कार्यकर्ता असल्याचे धाडीनंतर समजल्यावर स्थानिकांना याचा धक्काच बसला होता.

४. रुमडामळ, दवर्ली येथे ‘पी.एफ्.आय.’ सक्रीय असल्याने या ठिकाणी गेल्या काही वर्षांत विविध कारणे पुढे करून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न झाला आहे.

 (सौजन्य : AWAKE GOANS)

५. रुमडामळ, दवर्ली येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’ अशा घोषणाही देण्यात आलेल्या आहेत.

६. रुमडामळ-दवर्ली पंचायतीवर निवडून आलेला पंचसदस्य उम्रान पठाण हा ‘पी.एफ्.आय.’चा सदस्य असल्याचे आणि रुमडामळ-दवर्ली पंचायतीवर ‘पी.एफ्.आय.’चे वर्चस्व असल्याचे आरोप येथील काही स्थानिक मुसलमानपण करत आहेत. पोलिसांकडेही अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्या आहेत.

रुमडामळ-दवर्ली पंचायतीवर निवडून आलेला पंचसदस्य उम्रान पठाण हा ‘पी.एफ्.आय.’चा सदस्य

७. राज्यात नुकत्याच झालेल्या पंचायत निवडणुकीच्या काही दिवस आधी मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारमाध्यमांत प्रसारित करण्यात आली. याविषयी तक्रार करण्यात आल्यानंतर मडगाव शहर पोलिसांनी संशयित उम्रान पठाण याला कह्यात घेतले होते.