अमरावती येथे पी.एफ्.आय.च्या जिल्हाध्यक्षाला अटक

अमरावती – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट रचणारे पी.एफ्.आय संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची महाराष्ट्रभर धरपकड चालू असतांना या संघटनेचा अमरावती जिल्हाध्यक्ष सोहेल अन्वर याला अमरावती गुन्हे शाखेच्या पथकाने २७ सप्टेंबरच्या पहाटे ४ वाजता नागपुरी गेट क्षेत्रात अटक केली. पहाटे ५ वाजल्यापासून दुपारपर्यंत त्याची कसून चौकशी करण्यात आली.