प्राध्यापकाकडून खंडणी घेणार्‍या महिला पोलिसाचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !

पुणे – अल्पवयीन मुलीच्या साहाय्याने ‘पॉलिटेक्निक महाविद्यालया’तील प्राध्यापकाकडून ७ लाख रुपयांची खंडणी महिला पोलीस सोनाली हिंगे यांनी मागितली होती. तिचा अटकपूर्वक जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश पी.वाय. लाडेकर यांनी फेटाळला. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एप्रिल महिन्यात गुन्हा नोंद केला आहे. सरकार पक्षाचे अधिवक्ता सुनील हांडे यांनी सोनाली हिंगे ‘दामिनी पथका’तील सदस्य असून अन्य २ पोलीस कर्मचार्‍यांसह खंडणी प्रकरणातील सहआरोपी आहे. प्राध्यापकाकडून घेतलेल्या पैशांपैकी १ लाख रुपये तिच्याकडे गेल्याचा आरोप आहे. या प्रकरणात इलेक्ट्रॉनिक पुरावे, सीसीटीव्ही फुटेज आणि बनावट अर्जासंबंधी अधिक अन्वेषण करायचे आहे. महिला पोलीस सोनाली हिंगे अन्वेषणात सहकार्य करत नसल्याचेही त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून न्यायालयाने महिला पोलीस सोनाली हिंगेचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला.

संपादकीय भूमिका

पोलीसच अशा कृती करत असतील, तर सामान्य जनतेने दाद मागायची कुणाकडे ?