आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांचे निवेदन

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) – कोल्हापूर जिल्ह्यात गोंदिया एक्स्प्रेसद्वारे बांगलादेशी घुसखोर अवैधपणे मोठ्या प्रमाणात येत आहेत. यामागे मोठी यंत्रणा असून ही घुसखोरी न थांबवल्यास देशाला मोठा धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी इचलकरंजी परिसरात असे घुसखोर आले असतील, तर त्यांच्यावर कारवाई करावी, तसेच त्यांना कुणी आसरा देत असल्यास त्यांच्यावरही गुन्हा नोंद करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद आणि राष्ट्रीय बजरंग दल यांच्या वतीने प्रांताधिकारी दीपक शिंदे यांना देण्यात आले.
देशात हिंदु युवतींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले जात असून ‘लव्ह जिहाद’चे प्रकार वाढत आहेत. त्यामुळे ‘लव्ह जिहाद’विरोधी कठोर कायदा करावा, तसेच गोवंशहत्या बंदी कायद्याची प्रभावी कार्यवाही करावी, अशी मागणीही या निवेदनात करण्यात आली आहे. या प्रसंगी जिल्हामंत्री पंढरीनाथ ठाणेकर, जिल्हा विशेष संपर्क प्रमुख श्री. संतोष हत्तीकर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. दत्ता पाटील, जिल्हा संयोजक श्री. अनिकेत ताणुगडे, जिल्हाध्यक्षा सौ. अंजली पोळ, मीना माने, हिंदु जनजागृती समितीचे श्री. आकाश रणदिवे, सर्वश्री आनंदा मकोटे, सुनील कांदेकर, अशोक पुरोहित, जितेंद्र मस्कर यांसह अन्य उपस्थित होते.
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !
आषाढी यात्रेनिमित्त विधीवत् पूजा करून श्रींचा पलंग काढला : २४ घंटे दर्शन चालू !
पाणी योजना रखडल्याने मुख्यमंत्री आणि पालकमंत्री संतप्त !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखीचे लोणंद ते तरडगाव प्रस्थान !
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याचे पहिले उभे रिंगण पार पडले