मंचर (पुणे) येथे ११ जूनपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश !

प्रातिनिधीक इमेज

       मंचर (जिल्हा पुणे) – येथे पांडवकालीन बारव परिसरात ३० मे या दिवशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कलम १६३ अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले होते. पांडवकालीन बारव, शेजारील दर्गा आणि कब्रस्तानसह सभोवतालच्या ५० चौ.मी. परिसरात ५ पेक्षा अधिक लोक एकत्र जमणे, जाहीर सभा घेणे, मोर्चे काढणे, सार्वजनिक ठिकाणी शस्त्रे (लाठी, चाकू आणि बंदूक) बाळगण्यास सक्त मनाई केली होती. या आदेशाची मुदत ११ जूनच्या रात्री १२ वाजेपर्यंत वाढवण्यात आली असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी पाटील यांनी जारी केला आहे.