पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांच्या गदारोळामुळे दोन्ही सभागृहांचे कामकाज स्थगित !
संसदेच्या पहिल्याच दिवशी गदारोळ घालणार्यांना अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले पाहिजे म्हणजे संसदेचे कामकाज शांतपणे चालू राहील !
संसदेच्या पहिल्याच दिवशी गदारोळ घालणार्यांना अधिवेशनाच्या संपूर्ण कालावधीसाठी निलंबित केले पाहिजे म्हणजे संसदेचे कामकाज शांतपणे चालू राहील !
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशसाठी प्रचंड परिश्रम घेत आहेत. त्यामुळे आज उत्तरप्रदेशमध्ये कायद्याचे राज्य आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तरप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑलंपिक स्पर्धेसाठी सहभागी झालेल्या खेळाडूंशी ऑनलाईन संवाद साधला. या वेळी मोदींनी स्पर्धकांच्या कुटुंबियांचेही कौतुक केले. प्रवीण जाधव हा धनुर्विद्या या क्रीडा प्रकारात देशाचे नेतृत्व करत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सक्रीय नेतृत्व, अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान आणि देशातील डॉक्टरांचा सेवाभाव यांमुळे भारत कोरोना महामारीच्या दुसर्या लाटेतून हळूहळू बाहेर पडत आहे; पण तिसर्या लाटेचा धोका लक्षात घेता आपल्याला अतिशय काळजीपूर्वक पावले टाकण्याची आवश्यकता आहे.
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी खासदार शफीकुर्रहमान यांना प्रश्न केला आहे, ‘मुलांना जन्म देणे आणि त्यांचे पोषण करणे, ही जर अल्लाहची इच्छा आहे, तर धर्माच्या आधारावर सोयीसुविधा, अल्पसंख्यांक आयोग आणि अन्य आरक्षण सरकारकडे का मागता ?
केंद्रीय मंत्रीमंडळाचा नुकताच विस्तार झाला. यात ७ नवीन महिला मंत्र्यांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या मंत्रीमंडळात आता एकूण ११ महिला आहेत.
वक्तशीर रहा, आधीच्या मंत्र्यांशी चर्चा आणि न थकता काम करा, अशी त्रिसूत्री पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवीन नियुक्त झालेल्या मंत्र्यांच्या बैठकीत त्यांना सांगितली. या सर्व नवीन मंत्र्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही बैठक घेण्यात आली.
अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले.
केंद्रीय मंत्रीमंडळाचा विस्तार ७ जुलैला संध्याकाळी करण्यात आला. एकूण ४३ खासदारांना मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यात प्रामुख्याने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे, आसामचे माजी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल, ज्योतिरादित्य शिंदे आदींचा समावेश आहे.
फादर स्टॅन स्वामी यांना देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे अटक केली होती. त्यांच्यावर नक्षलवादाला साहाय्य आणि अवैध कृत्ये केल्याचे गंभीर गुन्हे दाखल होते.