गोव्यात आज मुसळधार पावसाची शक्यता

पणजी, २१ जुलै (वार्ता.) – भारतीय हवामान विभागाच्या गोवा केंद्राने २२ जुलै या दिवशी संपूर्ण गोव्यामध्ये मुसळधार पाऊस पडण्याची (यलो अलर्ट) चेतावणी दिली आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसासह प्रतिघंटा ४० ते ५० किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वहाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. २१ ते २७ जुलै या कालावधीसाठी गोव्यात सामान्य किंवा मध्यम स्वरूपाचा (ग्रीन अलर्ट) लागू करण्यात आला आहे. गेल्या २४ घंट्यांमध्ये (२१ जुलै या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत) फोंडा येथे सर्वाधिक ४० मि.मी., काणकोणमध्ये २८.४ मि.मी. अन् केपे येथे १७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. याखेरीज मुरगाव (१५.४ मि.मी.), धारबांदोडा (१२.४ मि.मी.), सांगे (१२ मि.मी.), सांखळी (११.६ मि.मी.), पेडणे (८.४ मि.मी.), एला-ओल्ड गोवा (७.५ मि.मी.), म्हापसा (६.४ मि.मी.), दाबोळी (५.८ मि.मी.) आणि मडगाव (५.४ मि.मी.) येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे. पणजी येथे १.४ मि.मी. पाऊस पडला आहे.