महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्‍या ४ मुसलमान तरुणांना अटक !

चित्रफीत सिद्ध करून प्रसारित करण्याची धमकी

पुणे – एका महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या २१ वर्षीय तरुणीवर ४ धर्मांधांनी १ वर्ष लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुख्य आरोपी फरहान शेख याच्यासह फजल शेख, रेहान शेख आणि साहिल यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी अश्लील कृत्य करतांनाची चित्रफीत काढून ती सामाजिक माध्यमांवर प्रसारित करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पीडित तरुणीने वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.

१. पीडित तरुणी विमाननगर परिसरात रहाणारी असून तिने वर्ष २०२४ मध्ये पुण्यातील एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याच महाविद्यालयात मुख्य आरोपी फरहान याच्याशी नोव्हेंबर २०२५ मध्ये तिची ओळख निर्माण झाली.

२. या ओळखीचा अपलाभ घेत फरहान याने तिच्याशी शारीरिक संबंध निर्माण केले. त्याची चित्रफीत सिद्ध करून ती प्रसारित करण्याची धमकी देत फरहानने दबाव टाकून त्याच्या ३ मित्रांनीही पीडितेवर अत्याचार केले.

३. या ४ जणांनी मिळून पीडितेवर गेल्या वर्षभरापासून विविध ठिकाणी अत्याचार केले. दीर्घकाळ मानसिक त्रास सहन केल्यानंतर पीडितेने तक्रार प्रविष्ट केली. या घटनेची पोलिसांनी गांभिर्याने नोंद घेत चारही आरोपींना तात्काळ अटक केली.

संपादकीय भूमिका

शरिया कायद्यानुसार अशा वासनांधांचे हात-पाय तोडण्याची कुणी मागणी केली, तर त्यात नवल ते काय ?