
मुंबई, २१ जुलै (वार्ता.) – राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि संलग्न रुग्णालये यांच्या परिसरात सुसज्ज धर्मशाळा उभारण्याला शासनाने मान्यता दिली आहे. महाराष्ट्र आणि राज्याच्या बाहेरून मोठ्या संख्येने उपचारासाठी येणारे रुग्ण अन् त्यांचे नातेवाईक यांना निवास, स्वच्छतागृह, स्नानगृह, पिण्याचे पाणी, भोजन यांसह अन्य मूलभूत सुविधा धर्मशाळेत दिल्या जाणार आहेत. अहमदाबाद (कर्णावती) येथील ‘सेवादान आरोग्य फाऊंडेशन’कडून ‘ना नफा, ना तोटा’ या तत्त्वावर या संस्थेकडून या धर्मशाळा उभारण्यात येणार आहेत.
नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय रुग्णालये, पुणे येथील ससून सर्वाेपचार रुग्णालय, यवतमाळ येथील श्री. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय (यवतमाळ), मुंबईतील जे.जे. समूह रुग्णालय आणि कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे सर्वाेपचार रुग्णालय या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न रुग्णालयांच्या येथे धर्मशाळा उभारण्यात येणार आहेत. धर्मशाळा उभारण्यासाठी राज्यशासनाकडून जागा देण्यात आली आहे.
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली