पुणे येथे सहदुय्यम निबंधकाला मारहाण केल्यामुळे निषेध

पुणे – हवेली तालुक्यातील हवेली क्र. २० या दस्त नोंदणी कार्यालयातील सहदुय्यम निबंधकाला मारहाण केल्याच्या निषेधार्थ २० जुलै या दिवशी राज्यातील सर्व ५२३ दस्त नोंदणी कार्यालये बंद होती. या दिवशीच्या १० ते १२ सहस्र दस्तांची नोंदणी रखडल्याने राज्य सरकारचा २०० कोटी रुपयांचा महसूल बुडला. ‘आरोपींना अटक होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही’, असा पवित्रा अधिकारी आणि कर्मचारी संघटनांनी घेतल्याने सरकारला या घटनेची नोंद घ्यावी लागली.
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘गुन्हेगार कुणीही असो, त्यांना शोधून योग्य ती शिक्षा देऊ’, असे आश्वासन दिले आहे. संघटनेच्या पदाधिकार्यासमवेत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. २१ जुलै या दिवशी राज्यातील सर्व नोंदणी कार्यालये नेहमीप्रमाणे चालू होती.
घटना काय ?आंबेगाव (दत्तनगर) येथील सहदुय्यम निबंधक कार्यालय (हवेली क्र. २०) मध्ये १७ जुलै या दिवशी कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे दस्त होणार नाही, असे सांगितले म्हणून प्रभारी सहदुय्यम निबंधक रवींद्र कोळी यांना अधिवक्ता योगेश कापरे, तुषार कापरे यांच्यासह २ जणांनी लाकडी बांबूने मारहाण केली. या प्रकरणी आंबेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. |
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली