सध्या ‘एआय’ कॅमेर्‍यावरून दंड आकारणार नाही

(‘एआय’ म्हणजे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स  कृत्रिम बुद्धिमत्ता)

पणजी – राज्यात नव्याने ‘एआय’वर आधारित वाहतूक देखरेख प्रणाली अनेक ठिकाणी कार्यन्वित करण्यात आलेली आहे. वाहतूक नियमाचे उल्लंघन केल्याच्या प्रकरणी या प्रणालीद्वारे तूर्तास दंड आकारण्यात येणार नाही. ‘एआय’ कॅमेर्‍यांद्वारे सिद्ध होणारी ई-चलने संपूर्ण यंत्रणा पूर्णपणे स्वयंचलित झाल्यानंतरच वाहनचालकांना पाठवली जाणार आहेत, असे परिवहन संचालक अरविंद खुटकर यांनी सांगितले आहे.