खंडणीखोर धर्मांध मुसलमान अटकेत !
नागपूर – ‘इन्स्टाग्राम’वर मैत्री झाल्यावर २२ वर्षीय तरुणीचे अपहरण करून तिच्या वडिलांकडे खंडणी मागणार्या जिशान अयुब अन्सारी (वय २१ वर्षे) याला पोलिसांनी अटक केली आहे. ‘५० सहस्र रुपये खंडणी न दिल्यास मुलीला ठार मारीन’, अशी धमकी आरोपीने दिली होती. पोलिसांनी सापळा रचून तरुणीची सुटका केली.
- संपादकीय भूमिका : धर्मांधांनी हिंदूंच्या मुलींना पळवून ‘खंडणी जिहाद’ही चालू केला आहे, असेच आता म्हणावे लागेल !अशांशी मैत्री करण्यापूर्वी सतर्कता बाळगा !
छत्रीचोराचा शोध चालू !
मुंबई – कांदिवलीतील चारकोपमध्ये एका आरोपीने चांगल्या दर्जाच्या छत्र्या चोरल्या. आतापर्यंत त्याने अनेक दुकानांतून छत्र्यांची चोरी केली आहे. त्याच्या विरोधात अनेक दुकानदारांनी तक्रारी दिल्या आहेत. सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. (साध्या छत्रीचोराला पकडू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कसे पकडणार ? – संपादक)
देहविक्रीच्या टोळीतील तिघांना अटक !
तळोजा – महिलांचा देहविक्रीसाठी वापर करणार्या टोळीला पोलिसांनी अटक केली. ९ महिलांची या वेळी सुटका करण्यात आली. अटक केलेल्यांमध्ये वसतीगृह व्यवस्थापकांसह तिघांचा समावेश आहे.
पोषण आहारात मृत पक्षी !

नाशिक – देवगाव अंगणवाडीतील पोषण आहाराच्या बंद पाकिटात कुजलेल्या अवस्थेतील मृत पक्षी आढळला. या प्रकरणी अधिक चौकशी करण्यात येत आहे. दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही केली जात आहे.
- संपादकीय भूमिका : विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणार्या संबंधितांना कामावरून काढून टाकायला हवे !
ताकात माशी, तर कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळला !
मुंबई – मुंबई महापालिका मुख्यालयातील उपाहारगृहातील ताकाच्या पेल्यात माशी आणि कांदा भजीमध्ये प्लास्टिकचा धागा आढळून आला. कंत्राटदाराला याविषयी खडसावल्यावर त्याने ‘यापुढे अशी चूक होणार नाही’, असे सांगितले. (खाद्यपदार्थांच्या संदर्भात हलगर्जीपणा करणार्यांना संधी देऊन काय उपयोग ? अशांना बडतर्फच करायला हवे ! – संपादक)
नोकरीसाठी गेलेला तरुण परदेशात अडकला
पनवेल – परदेशातील चांगल्या नोकरीच्या आमिषाला भुलून एक तरुण प्रथम बँकॉकला गेला. नंतर त्याला म्यानमारमध्ये एका टोळीच्या कह्यात देण्यात आले. मुलाच्या सुटकेसाठी कर्करोगग्रस्त आईचे मंगळसूत्र आणि दागिने विकून ८ लाख रुपये उभे करण्यात आले; पण अद्याप मुलाची सुटका झालेली नाही.
- संपादकीय भूमिका : परदेशात जाण्यापूर्वी संपूर्ण माहितीची निश्चिती करून घ्यायला हवी !

सध्या ‘एआय’ कॅमेर्यावरून दंड आकारणार नाही
१ ऑगस्टपासून ‘म्हाजी बस योजना’ संपूर्ण गोव्यात लागू होणार
उल्हासनगर येथे घरफोडी करणार्या धर्मांधाला अटक; १० लाख ९० सहस्र रुपयांचे दागिने जप्त !
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !