मंडपाच्या गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह ?

पंढरपूर – गोपाळपूर रस्त्यालगत उभारलेला तात्पुरता निवारा मंडप अचानक कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र यात्रेच्या काळात या परिसरात सहस्रो भाविकांची वर्दळ असते. त्या वेळी मंडप कोसळला असता, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, अशी चर्चा चालू आहे.
गोपाळपूर रस्त्यावर अनुमाने १२५ कोटी रुपयांच्या ‘भक्त दर्शन मंडपा’चे काम चालू आहे. त्यामुळे ती जागा दर्शनरांगेसाठी उपलब्ध नसल्याने श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील रांग अधिक लांब जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. याच कारणामुळे भाविकांसाठी उभारण्यात येणार्या तात्पुरत्या निवार्याला अधिक महत्त्व आले आहे. आषाढी यात्रेच्या वेळी पावसाची शक्यता लक्षात घेऊन गोपाळपूर परिसरातील मोकळ्या जागेत प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही तात्पुरता निवारा मंडप उभारण्यात आला होता; मात्र तो अचानक कोसळल्याने गुणवत्तेविषयी प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मंडप नेमका कशामुळे कोसळला ?
याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही; पण प्राथमिक माहितीनुसार हा मंडप ग्रामपंचायतीद्वारे नव्हे, तर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आला होता. त्यामुळे या कामाची सखोल चौकशी करून उत्तरदायींवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
| आषाढी यात्रेची सिद्धता चालू होताच पंढरपूर शहरात विविध विकासकामांना वेग येतो. रस्तेदुरुस्ती, खड्डे बुजवणे, सुशोभीकरण आणि इतर सुविधा उभारण्याची कामे अनेकदा वारीच्या अगदी तोंडावर केली जातात. त्यामुळे या कामांच्या दर्जाविषयी नेहमीच प्रश्न उपस्थित होत असतात. आता भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवारा मंडपाच्या दर्जाविषयीही शंका निर्माण झाली आहे. |
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
ज्ञानोबा-तुकारामांचा गजर, विठ्ठल भेटीला निघाला सागर !
श्री विठ्ठल : तत्त्वज्ञानाचे आराध्यदैवत !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)