
जुन्नर (जिल्हा पुणे) – येथे पोलिसांनी रात्री पहारा देतांना बंद असलेल्या अहिल्यादेवी होळकर शाळा क्रमांक ४ च्या मैदानात कारवाई केली. या कारवाईत ३ किलो गांजा, १ चारचाकी आणि १ दुचाकी असा एकूण १० लाख ५० सहस्र रुपयांचा मुद्देमाल कह्यात घेतला. या प्रकरणी आरोपी मयूर खराडे याच्या इनोव्हा गाडीत २.०६६ किलो गांजा आढळला, तसेच घटनास्थळावरून पसार झालेल्या आरोपीच्या दुचाकीतून ९६२ ग्रॅम गांजा असा एकूण ३.०२८ किलो गांजा कह्यात घेण्यात आला. हे आरोपी अमली पदार्थांच्या अवैध विक्रीसाठी वाहतूक करत असल्याचे अन्वेषणात निष्पन्न झाले. या प्रकरणी जुन्नर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. एका आरोपीला अटक करण्यात आली असून २ आरोपी पसार आहेत. न्यायालयाने आरोपीला ३ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. (अमली पदार्थांवर बंदी असून त्याचा काही उपयोग होत नाही. अमली पदार्थांची विक्री अद्यापही अनेक मार्गांनी चालूच आहे. अमली पदार्थांची विक्री कायमस्वरूपी थांबवण्यासाठी पोलीस कठोर कारवाई केव्हा करणार ? – संपादक)
राज्यातील ६ शासकीय वैद्यकीय रुग्णालयांच्या जवळ उभारण्यात येणार सुसज्ज धर्मशाळा !
आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे जाण्यासाठी पुणे विभागातून ३५० अधिकच्या गाड्या !
पंढरपूर येथे यात्रेसाठी उभारलेला तात्पुरता मंडप कोसळला !
महाविद्यालयीन तरुणीवर वर्षभर अत्याचार करणार्या ४ मुसलमान तरुणांना अटक !
थोडक्यात महत्वाचे : (२२.०७.२०२६)
भूसंपादनाच्या प्रकरणी सा.बां. खात्याने ७१४ दिवस विलंबाने प्रविष्ट केलेली आव्हान याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली