देहलीतील आंदोलनाच्या माध्यमातून अराजकता पसरवण्याचा प्रयत्न ! – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री

मुंबई – आंदोलनाला नेतृत्व नसेल, तर त्यामुळे विविध प्रवृत्ती शिरतात.  देहलीमधील आंदोलनाच्या माध्यमातून खांद्यावर बंदूक ठेवून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. अनेक राजकीय पक्ष या आंदोलनाच्या माध्यमातून राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. या आंदोलनाच्या माध्यमातून देशात अराजक पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. ‘नीट’ परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी त्यागपत्र द्यावे, या मागणीसाठी देहली येथील जंतरमंतर मैदानावर ‘कॉकरोच जनता पक्षा’कडून आंदोलन चालू आहे. याविषयी पत्रकारांनी विचारल्यावर देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका मांडली.