राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय यांतील आधुनिक वैद्य ११ जानेवारीला संपावर जाणार

राज्यातील शेकडो वैद्यकीय अधिकारी आणि आधुनिक वैद्य संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणा कोलमडण्याची शक्यता आहे.

इंग्लंड येथून परतलेल्या आणि ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात अहवालाच्या प्रतिक्षेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा आंदोलनाचा पवित्रा

इंग्लंड येथून परतलेल्या आणि मडगाव येथील ‘इ.एस्.आय.’ रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. हे रुग्ण नवीन कोरोना विषाणूसंबंधीच्या पुणे येथील प्रयोगशाळेच्या अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत.

१५ जानेवारीपासून राज्यव्यापी शाळा बंद करण्याची महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाची चेतावणी 

देशातील इतर राज्यांमध्ये शिक्षणावर ९ ते १० टक्के व्यय केला जातो; मात्र महाराष्ट्रात तो ६ टक्के केला जातो.

आमदार दिलीप बनकर यांच्या मुलाच्या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह सहस्रोंची उपस्थिती

नियम न पाळल्याविषयी जशी सामान्यांवर कारवाई होते, तशी कारवाई वरिष्ठ अधिकारीन वर केली जाणार का ?

ब्रिटनमधील नवीन प्रकाराच्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव, ८ रुग्ण आढळले

मुंबईतील ५, तर पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण यांच्यात या कोरोनाच्या विषाणूची लक्षणे आढळली आहेत.

सर्वांना नाही, तर केवळ लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातील लोकांना कोरोना लस विनामूल्य मिळणार !

देशात कोरोनाच्या लसीकरणाच्या केवळ पहिल्या टप्प्यात लस विनामूल्य दिली जाणार आहे. १ कोटी आरोग्य सेवा कर्मचारी आणि कोरोना काळात पहिल्या फळीत काम करणारे २ कोटी कर्मचारी यांना लस देण्यात प्राधान्य दिले जाणार आहे.

लाल मुंग्यांची चटणी कोरोनावरील उपचारांत वापरता येऊ शकते का ?  

आदिवासी लोक लाल मुंग्यांचा वापर ताप, सर्दी-खोकला, श्‍वास घेण्यास त्रास, थकवा आणि अन्य आजारांवर उपचार म्हणून करतात.