ब्रिटनमधील नवीन प्रकाराच्या कोरोना विषाणूचा महाराष्ट्रात शिरकाव, ८ रुग्ण आढळले

मुंबई – ब्रिटनमध्ये आढलेल्या नवीन प्रकाराच्या कोरोनाच्या विषाणूचा आता महाराष्ट्रातही शिरकाव झाला आहे. मुंबईतील ५, तर पुणे, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील प्रत्येकी एक रुग्ण यांच्यात या कोरोनाच्या विषाणूची लक्षणे आढळली आहेत. या सर्व रुग्णांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.