संभाव्य आपत्तीत स्थानिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासन सिद्ध ! – डॉ. राजा दयानिधी, जिल्हाधिकारी, सांगली

संभाव्य आपत्ती व्यवस्थापन नियोजनाच्या अनुषंगाने स्थानिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यासाठी शिराळा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने सतर्क रहावे. पावसाचा वाढता जोर पहाता स्थानिकांनीही याविषयी तात्काळ माहिती द्यावी आणि प्रशासनास सहकार्य करावे.

इरशाळवाडी दुर्घटनेत आतापर्यंत २४ जणांचा मृत्यू !

इरशाळवाडी येथे परिसरात दुर्गंधी येत आहे. दुर्गंधीमुळे रोगराई पसरू नये, यासाठी परिसरात औषध फवारणी करण्यात आली आहे.

दरड कोसळण्याच्या घटनांमुळे पुणे घाटातील वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्याचा प्रशासनाचा आदेश !

पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणार्‍या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णपणे बंद रहाणार आहे

यवतमाळ येथे पुरातील ४५ जणांना वाचवण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर प्रतिकूल हवामानामुळे परतले !

अनेकांच्या घरात पुराचे पाणी शिरलेले आहे. ३५७ हेक्टरवरील पिके पाण्यात बुडाली आहेत. २५ गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठावरील गावांना सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे.

लोकांच्या कल्याणासाठी अधिकार्‍यांनी तत्परतेने काम करावे ! – पालकमंत्री उदय सामंत

अधिकार्‍यांना अशा सूचना का द्याव्या लागतात ! खरे तर अधिकार्‍यांनी स्वत:च लोकांच्या कल्याणासाठीच कामे करायला हवीत !

राज्‍यातील दरडप्रवण क्षेत्रातील घरे सुरक्षित ठिकाणी स्‍थलांतरित करणार !

इरशाळवाडी येथील दुर्घटनेच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यशासनाने हा निर्णय घेतला आहे. विधानसभेत आमदार महेश बालदी यांनी रायगड येथील अन्‍य धोकादायक वाड्यांविषयीचा प्रश्‍न सभागृहात उपस्‍थित केला.

इरशाळवाडीतील बाधितांना सिडकोच्‍या माध्‍यमातून कायमस्‍वरूपी घरे देणार ! – एकनाथ शिंदे, मुख्‍यमंत्री

इरशाळवाडीमधील बाधित कुटुंबियांची तात्‍पुरती कंटेनरमध्‍ये व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. या सर्व कुटुंबांची कायमस्‍वरूपी निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे.

इरशाळवाडीसारख्‍या घटनांना मानवी हस्‍तक्षेपही कारणीभूत ! – डॉ. माधव गाडगीळ

डॉ. गाडगीळ यांच्‍यासारख्‍या तज्ञांच्‍या अहवालांचा अभ्‍यास करून त्‍यानुसार शासनाने कृती करावी, ही अपेक्षा !

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात गेल्या २ दिवसांपासून पुष्कळ मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून पूरसदृश स्थितीमुळे अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली आहे. वादळी वार्‍यासह पडणार्‍या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहे.

गोव्यात मुसळधार पावसामुळे पडझडीच्या घटना चालूच !

राज्यात मुसळधार पावसामुळे झाडे घरे, वाहने यांवर उन्मळून पडणे, घरे कोसळणे यांसारख्या विविध घटना चालू आहेत. संक्षिप्त वृत्तांत प्रस्तुत करीत आहोत . . .