भोर (जिल्हा पुणे) – राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे काही ठिकाणी दरड कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे पुणे येथून भोरमार्गे महाडला जाणार्या मार्गावरील वरंधा घाट रस्ता बंद करण्यात आला आहे. हा घाट अवजड वाहतुकीकरता पूर्णपणे बंद रहाणार आहे, तसेच हवामान विभागाकडून जेव्हा जेव्हा ‘रेड अलर्ट’ आणि ‘ऑरेंज अलर्ट’ असेल, तेव्हा हलक्या वाहनांसह सर्व प्रकारची वाहतूक बंद असणार आहे, असा आदेश पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी काढला आहे. वाहन धारकांना वरंधा घाट बंद झाल्यामुळे ताम्हिनी घाटाचा पर्याय आहे. हा घाट वरंधा घाटापेक्षा अधिक सुरक्षित आहे.