तायपेई सिटी (तैवान) – ‘कोइनू’ नावाच्या सोसाट्याच्या चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडत असून तैवानमध्ये हाहा:कार माजला आहे. चक्रीवादळामुळे अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. सोसाट्याच्या वार्यामुळे विजेचे खांबही वाकले. वादळ ज्या दिशेने गेले, त्या वाटेत उभ्या असलेल्या वाहनांची नासधूस झाली.
ताइवान में आया शक्तिशाली तूफान ‘कोइनू’, टेंशन में सरकार, उड़ानें और स्कूल बंद करने के दिए आदेशhttps://t.co/075BLKCPmq#taiwangovernment #powerfulstorm #koinu
— India TV (@indiatvnews) October 5, 2023
‘तैवान हवामान संस्थे’ने इशारा दिला की, चक्रीवादळामुळे काही भागांत पूर आणि भूस्खलन होऊ शकते. अनेक विमान उड्डाणे आणि रेल्वे सेवा रहित करण्यात आली आहे. तैवानजवळ असलेल्या चीनच्या ग्वांगडोंग प्रांतामध्ये ३० सेंटीमीटरपेक्षा अधिक पाऊस होण्याची शक्यता वर्तवली गेली आहे.