चिक्कमगळुरू (कर्नाटक) येथे मटण म्हणून गोमांस असलेले जेवण देणार्‍या हॉटेल्सवर पोलिसांची धाड !

पोलिसांनी ‘न्यामत’ या हॉटेलमधून २० किलो गोमांस जप्त केले. हॉटेल मालक इर्शाद अहमद याला अटक करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येत आहे.

‘जी-२०’ परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर देहलीत सुशोभिकरण करतांना शिवलिंगांचा अवमान !

अन्य धर्मियांच्या धर्मश्रद्धांचा असा अवमान करण्याचे संबंधितांचे धाडस झाले नाही , कारण त्यांना त्याचे परिणाम काय होऊ शकतात ?, हे ठाऊक आहे.

न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

पंजाबमध्ये खलिस्तानी आतंकवाद्याच्या टोळीतील ६ जणांना अटक  

अशांना जलद गती न्यायालयात खटला चालवून फाशीचीच शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक !

केंद्रशासन जम्मू-काश्मीरमध्ये कधीही निवडणुका घेण्यास सज्ज !

केंद्रशासनाची सर्वोच्च न्यायालयात माहिती

महाविद्यालयात फाटक्या जीन्स आणि आक्षेपार्ह कपडे घालणार नाही !

कोलकात्यातील आचार्य जगदीशचंद्र बोस महाविद्यालय विद्यार्थ्यांकडून लिहून घेत आहे प्रतिज्ञापत्र !

कपाळावर टिळा लावणे, मनगटावर लाल दोरा बांधणे आदींपासून विद्यार्थ्यांना रोखता येणार नाही ! – मध्यप्रदेश उच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

या वेळी न्यायालयाने आसफा शेख, अनस अतहर आणि रुस्तम अली या शाळेच्या व्यवस्थापकांना ५० रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर सशर्त जामीन संमत केला.

बरेली (उत्तरप्रदेश) येथील होली फॅमिली कॉन्व्हेंट शाळेमध्ये मुलांना रक्षाबंधन साजरे करण्यापासून अडवले !

कॉन्व्हेंट शाळांचा हिंदुद्वेष जाणा ! सरकारने अशा शाळांची अनुमती रहित करायला हवी, तरच यापुढे असे धाडस कुठल्या शाळा करणार नाही !

वाहन चालवणार्‍या अल्पवयीन मुलाच्या पालकांना शिक्षा होऊ शकते ! – पोलीस

१८ वर्षांखालील जे विद्यार्थी वाहन चालवतात, त्यांच्या पालकांना वाहतूक नियमांच्या आधारे कारावासाची शिक्षा ठोठावता येते. संबंधित विद्यार्थ्यांनी हे ध्यानात ठेवावे, अशी माहिती कळंगुट पोलीस ठाण्यातील वाहतूक विभागाचे साहाय्यक उपनिरीक्षक बशिर मुल्ला यांनी विद्यार्थ्यांना दिली.

श्री क्षेत्र तपोभूमी येथील यज्ञोपवित विधीची ‘एशिया बुक’मध्ये नोंद

कुंइई येथील श्रीक्षेत्र तपोभूमी येथे ३० ऑगस्ट या दिवशी श्रावणविधी झाला. या वेळी यज्ञोपवित धारण करण्याच्या कार्यक्रमात ५ सहस्र २०० भाविकांचा सहभाग होता. मोठ्या संख्येने उपस्थिती लाभल्याने या कार्यक्रमाची ‘एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ आणि ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स’ यांमध्ये नोंद करण्यात आली आहे.