न्यायव्यवस्थेत प्रचंड भ्रष्टाचार असून  न्यायाधीश अधिवक्त्यांनी लिहून दिलेला निर्णयच देतात !

राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचा गंभीर आरोप !

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत

जयपूर (राजस्थान) – आज न्यायव्यवस्थेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आहे. मी ऐकले आहे की, अनेक अधिवक्ते न्यायाधिशांना काय निकाल द्यायचा ?, ते लिहून देतात. अशा प्रकारे निवाडे होत आहेत. मग ती खालची न्यायव्यवस्था असो किंवा वरची. गोष्टी गंभीर आहेत. देशवासियांनी विचार करावा, असे विधान राजस्थानमधील काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येथे पत्रकारांशी बोलतांना केले.

संपादकीय भूमिका

मग मुख्यमंत्री याविषयी चौकशीचा आदेश का देत नाहीत ?