बुधवार पेठेत (पुणे) ३ मासांपासून अवैध वास्तव्य करणार्‍या १९ बांगलादेशींना अटक !

बांगलादेशी नागरिक ३ मासांपासून अवैध पद्धतीने वास्तव्य करत असतांना पोलिसांना याचा थांगपत्ता कसा लागत नाही ?

मुंबई येथे ‘महेंद्रगिरी’ युद्धनौकेचे जलावतरण !

उपराष्ट्रपती श्री. जगदीप धनखड यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या पत्नी डॉ. सुदेश धनखड यांच्या हस्ते युद्धनौकेचे जलावतरण करण्यात आले. या सोहळ्याला मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, राज्यपाल श्री. रमेश बैस, कामगारमंत्री श्री. सुरेश खाडे, नौदलाचे अधिकारी आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत स्थायी सदस्यत्व मिळाले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वसार्हता संपेल ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असणारा आणि पाचवी सर्वांत मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अशा वेळी जर भारताला संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व दिले नाही, तर संयुक्त राष्ट्रांची विश्‍वासार्हर्ता संपेल.

सद्गुणांचा विकास हे राष्ट्र उभारणीचे महत्त्वाचे कार्य ! – आनंद जाखोटिया

आयुष्यात सतत आनंदी रहाण्यासाठी आपण सतत धडपड करत असतो; पण जेव्हा तणाव किंवा दुःखाचा प्रसंग येतो, तेव्हा आपण परिस्थितीकडे किंवा इतरांच्या वाईट वृत्तींकडे पहातो.

पणजी (गोवा) येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये पार पडले महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाचे व्याख्यान !

येथील ‘गोवा म्युझिक कॉलेज’मध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने संगीत समन्वयक सुश्री (कु.) तेजल पात्रीकर यांचे ‘संगीताकडे आध्यात्मिक दृष्टीने पहाण्याचा दृष्टीकोन’ या विषयावर २६ ऑगस्ट या दिवशी व्याख्यान पार पडले.

इंडिया आघाडीच्या समन्वयासाठी समितीची स्थापना !

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मुंबईत चालू असलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या बैठकीत १ सप्टेंबर या दिवशी समन्वयासाठी १३ जणांची समिती स्थापन करण्यात आली.

राजस्थानमध्ये ९३ वर्षीय महंत सियाराम दास यांची हत्या

महंत सियाराम दास बाबा बुरिया गेल्या ५० वर्षांपासून श्री महादेव मंदिरात राहून पूजा करत  होते. त्यांच्या हत्येमुळे संत समाजात अप्रसन्नता निर्माण झाली आहे.

पाकमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात ९ सैनिक ठार

पाकच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतामध्ये आतंकवाद्याने केलेल्या आत्मघातकी (स्वतःच्या शरिरावर बाँब बांधून त्याचा स्फोट घडवून आणणे) आक्रमण करून पाक सैन्याच्या वाहनाला उडवले.

मतभेद नसल्याचा दावा करत लोकसभा निवडणुकीत भाजपला पराभूत करण्याचा इंडिया आघाडीचा विश्‍वास !

‘स्वीस बँकेतील पैसे घेऊन येऊ’, असे आश्‍वासन देणार्‍यांनी अद्याप काळा पैसा भारतात आणलेला नाही. आम्ही मोदी यांना हटवूच.

इस्रोच्या शास्त्रज्ञांनी तिरुपती मंदिरात जाऊन अर्पण केली ‘आदित्य एल् १’ची प्रतिकृती !

‘विज्ञानवादी असले, म्हणजे व्यक्ती नास्तिक असली पाहिजे’, अशी विचारसरणी भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी निर्माण केली आहे. ती कशी खोटी आहे ?, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कृतीतून लक्षात येते !