कायदाबाह्य विवाहातून जन्मलेली मुलेही पालकांच्या संपत्तीचे वारसदार असणार !

कायदाबाह्य विवाहातून जन्माला आलेल्या अपत्यांना पालकांच्या स्व-अधिग्रहित, तसेच वडिलोपार्जित संपत्तीत हिस्सा मिळण्याचा अधिकार असेल, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

(म्हणे) ‘देहलीत निर्माण केलेली कारंजी ही शिवलिंग नाहीत, तर कलाकृती आहे !’ – उपराज्यपाल व्ही.के. सक्सेना

कलाकृती शिवलिंगाच्या आकाराप्रमाणे असणे, हीसुद्धा चूकच आहे; कारण त्यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे यास उत्तरदायी असणार्‍यांविरुद्ध सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे !

‘प्रज्ञान’ रोव्हरकडून गेल्या १० दिवसांत १०० मीटरचे मार्गक्रमण !

सध्या ‘प्रज्ञान’ विक्रम लँडरपासून (‘शिवशक्ती पॉईंट’पासून) १०० मीटर अंतरावर आहे. याचे छायाचित्रही ‘इस्रो’ने प्रसारित केले आहे. चंद्रावर या दोघांच्या अस्तित्वाचे अद्याप ४ दिवस शेष आहेत.

गुजरातमध्ये मुसलमान तरुणींसमवेत दिसणार्‍या हिंदु तरुणांना लक्ष्य करणार्‍या ४ मुसलमानांना अटक

मुसलमान तरुण आणि हिंदु तरुणी यांना विरोध करणार्‍या हिंदूंना ‘मैत्रीला किंवा प्रेमाला रंग नसतो’, असा फुकाचा उपदेश करणारे आता कुठल्या बिळात जाऊन लपले आहेत ?

प्रतापगड (राजस्थान) येथे पतीनेच गर्भवती पत्नीला निर्वस्त्र करून गावकर्‍यांसमोर १ किलोमीटर पळायला लावले !

मणीपूर येथील महिलांना निर्वस्त्र केल्याच्या घटनेवरून टीका करणारी काँग्रेस स्वतःच्या राज्यात घडणार्‍या अशा घटनांविषयी मौन बाळगते, हे लक्षात घ्या !

खडपाबांध, फोंडा येथे मूर्तीशाळा आणि शेतकरी बाजार यांचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते उद्घाटन

‘आविष्कार कला केंद्र’ आणि ‘शेतकरी बाजार कृषी सेवा केंद्र’ यांच्या वतीने खडपाबांध, फोंडा येथील रविनगरजवळील धायमोडकर सदन येथे श्री गणेशमूर्ती शाळा अन् शेतकरी बाजार हा संयुक्त उपक्रम राबवला जात आहे.

वर्ष १९९३ मधील वीज घोटाळ्याचे अन्वेषण साक्षीदारांच्या अभावी ठप्प होण्याची चिन्हे !

एखाद्या प्रकरणाचे तब्बल २० वर्षे अन्वेषण चालू रहाणे पोलिसांना लज्जास्पदच !

गोव्यात प्रत्येक तिसर्‍या दिवसाला एक बलात्कार किंवा अपहरण

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

पर्वरी येथील युवतीची प्रियकराकडून हत्या, तर दवर्ली येथील युवकाची चॉपरने वार करून हत्या

गोव्यात हत्यांची शृंखला चालूच पणजी, १ सप्टेंबर (वार्ता.) – डिचोली, फातोर्डा आणि बाणस्तारी येथे ३० ऑगस्ट या दिवशी घडलेल्या हत्यांच्या घटना ताज्या असतांनाच १ सप्टेंबर या दिवशी आणकी दोन हत्या झाल्या आहेत. पर्वरी येथील कामाक्षी (वय ३० वर्षे) या युवतीची तिचाच पूर्वीचा प्रियकर प्रकाश चुंचवड (वय २२ वर्षे) याने हत्या करून मृतदेह आंबोलीच्या घाटात फेकला. … Read more

शिवरायांची वाघनखे आणण्यासाठी मुख्यमंत्री लंडनला जाणार !

‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची ब्रिटन येथे असलेली वाघनखे लवकरच महाराष्ट्रात आणण्यात येतील.