तिरुपती (आंध्रप्रदेश) – ‘इस्रो’च्या शास्त्रज्ञांनी सुर्याच्या अभ्यासासाठी अवकाशात पाठवण्यात येणार्या ‘आदित्य एल् १’ या यानाची प्रतिकृती तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिरात जाऊन अर्पण केली. इस्रोचे शास्त्रज्ञ नेहमीच त्यांचे यान आणि उपग्रह अवकाशात पाठवण्यापूर्वी त्या त्या यानांची प्रतिकृती श्री व्यंकटेश्वर मंदिरात अर्पण करत असतात. ‘चंद्रयान-३’च्या प्रक्षेपणाच्या वेळीही त्यांनी प्रतिकृती अर्पण केली होती.
आदित्य एल1 के लॉन्च से पहले तिरुपति मंदिर पहुंची इसरो वैज्ञानिकों की टीम#AdityaL1Launch #VenkateshwaraTemple #ISROhttps://t.co/K7SVFknOuc
— ABP News (@ABPNews) September 1, 2023
संपादकीय भूमिकाइस्रोचे शास्त्रज्ञ विज्ञानवादी असले, तरी ते आस्तिक आहेत. ‘विज्ञानवादी असले, म्हणजे व्यक्ती नास्तिक असली पाहिजे’, अशी विचारसरणी भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांनी निर्माण केली आहे. ती कशी खोटी आहे ?, हेच इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कृतीतून लक्षात येते ! |