मणीपूरमधील हिंसाचारात ८ जणांचा मृत्यू

गेले काही दिवसांपासून राज्यात शांतता निर्माण झाली होती; परंतु आता पुन्हा हा हिंसाचार झाला. मैतेई हिंदु समाज आणि कुकी ख्रिस्ती यांच्यात हा गोळीबार झाला. 

‘एक देश एक निवडणूक’ यासाठी केंद्रशासनाकडून समितीची स्थापना !

माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची अध्यक्षपदी निवड !

सरकारमधील मंत्र्यांसाठीच्या कर्मचार्‍यांच्या जून मासाच्या वेतनावर ७८ लाख रुपये खर्च

गोवा सरकारमध्ये मुख्यमंत्र्यासह एकूण १२ मंत्री आहेत. या सर्व मंत्र्यांच्या कार्यालयांमध्ये कार्यालय साहाय्यकापासून ‘विशेष सेवेसाठी अधिकारी’ (ओ.एस्.डी.) अशा विविध पदांसाठी एकूण १९२ कर्मचारी सेवेत आहेत.

‘आप’चे गोवा विभागाचे प्रमुख अमित पालेकर पोलिसांच्या कह्यात

बाणस्तारी येथे मर्सिडीस वाहनाने धडक दिल्याने तिघांचा मृत्यू झाल्याच्या प्रकरणी ‘आप’चे गोवा विभाग प्रमुख तथा अधिवक्ता अमित पालेकर यांना गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी कह्यात घेतले आहे.

फातर्पा येथे शिक्षकाकडून, तर गोवा विद्यापिठातील प्राध्यापकाकडून विद्यार्थिनींचा विनयभंग

गेल्या ७५ वर्षांत समाजाला साधना न शिकवल्याचा हा परिणाम आहे. असे प्रकार रोखण्यासाठी अजूनही अभ्यासक्रमात ‘साधना’ हा विषय शिकवून पुढील पिढ्यांत नैतिकता रुजवता येईल !

‘भारतरत्न’ नव्हे, ‘जुगाररत्न’चे फलक दाखवून आमदार बच्चू कडू यांचे सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर आंदोलन !

पैसा महत्त्वाचा नाही, देश महत्त्वाचा आहे, हे सचिन तेंडुलकर यांनी लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी विज्ञापन सोडावे किंवा भारतरत्न तरी परत करावा, असे आवाहन या वेळी बच्चू कडू यांनी केले.

अदानी यांच्या माध्यमातून १ बिलीयन डॉलर विदेशात पाठवण्यात आले ! – राहुल गांधी, काँग्रेस

अदानी देशातील विविध मालमत्तांची खरेदी करत आहेत, असा आरोप करत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी या प्रकरणाच्या अन्वेषणाची मागणी केली.

‘इंडिया आघाडी’च्या बैठकीसाठी कोट्यवधी रुपयांचा व्यय ! – उद्योगमंत्री उदय सामंत  

भाजपच्या विरोधात एकवटलेल्या देशातील विविध राजकीय पक्षांच्या ‘इंडिया आघाडी’ची बैठक मुंबईतील ‘ग्रँड हयात’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आली.

यापुढे फाशीच्या शिक्षेवरील दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचा निर्णयच अंतिम !

यापुढे आरोपीच्या दयेच्या याचिकेवर राष्ट्रपतींचाच निर्णय अंतिम असेल. राष्ट्रपतींनी घेतलेल्या निर्णयाला देशातील कोणत्याही न्यायालयात आव्हान देता येणार नाही.

भोपाळ (मध्यप्रदेश) येथे हिंदु जनजागृती समितीकडून ‘हलाल जिहाद’च्या विरोधात व्यावसायिकांचे प्रबोधन !

हलाल (इस्लामनुसार जे वैध आहे ते) प्रमाणपत्राच्या माध्यमातून समांतर अर्थव्यवस्था निर्माण होत आहे.