मंत्री नवाब मलिक यांच्या जावयांना अटक

अमली पदार्थ नियंत्रक विभागाने (एन्.सी.बी.) अमली पदार्थ विक्री आणि दलाली या प्रकरणी १३ जानेवारी या दिवशी समीर खान यांना अटक केली आहे. समीर खान हे राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांचे जावई आहेत.

बांधकाम व्यावसायिकाला ग्राहकांवर एकतर्फी करार लादता येणार नाही ! – सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

घर घेणार्‍यांवर बांधकाम व्यावसायिक एकतर्फी करार लादू शकत नाही. ‘ग्राहकाला वेळेवर घर न दिल्यास बांधकाम व्यावसायिकाला टाळाटाळ न करता खरेदीदाराला पूर्ण रक्कम ९ टक्के व्याजासह परत करावी लागेल’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

प्रजासत्ताकदिनाच्या संचलनामध्ये बांगलादेशचे सैनिक सहभागी होणार

यावर्षीच्या प्रजासत्ताकदिनाच्या संचलनामध्ये बांगलादेशचे सैनिक सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. बांगलादेश मुक्ती संग्रामाला ५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर हे सैनिक सहभागी होणार आहेत.

मुसलमान तरुणीशी विवाह करणार्‍या हिंदु तरुणाची हत्या

हिंदु तरुणाने मुसलमान तरुणीशी विवाह केल्यावर नेहमीच त्याची हत्या झाल्याच्या घटना घडतात, यावर निधर्मीवादी मात्र तोंड बंद ठेवतात !

सौ. विजया श्रीपाद नाईक पंचतत्त्वात विलीन : अनेकांनी घेतले अंतिम दर्शन

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी सौ. विजया श्रीपाद नाईक यांना १४ जानेवारी या दिवशी त्यांच्या आडपई या मूळ गावात आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे कुटुंबीय आणि त्यांचे असंख्य चाहते यांनी साश्रूनयनांनी अखेरचा निरोप दिला.

इंडियन ऑईल आस्थापन ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच पोचवणार

सरकारी आस्थापन इंडियन ऑईलने आता तात्काळ सेवा देण्याची योजना बनवली आहे. यानुसार ग्रहकांनी मागणी केल्यानंतर केवळ ३० ते ४५ मिनिटांत सिलिंडर घरपोच देण्यात येणार आहे; मात्र यासाठी अतिरिक्त शुल्क द्यावे लागणार आहे.

(म्हणे) ‘नथुराम गोडसे देशातील पहिला आतंकवादी आहे ! – काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह

कुणाला आतंकवादी म्हणावे, हेही न कळलेले काँग्रेसी ! जिहादी आतंकवादी ओसामा बिन लादेन याला आदराने ‘ओसामाजी’ म्हणणार्‍या दिग्विजय सिंह यांनी असे विधान करण्यात नवल ते काय ?

‘गोडसे ज्ञानशाळा’ वाचनालय पोलिसांकडून बंद !

मशिदी आणि मदरसे यांतून भारतविरोधी आणि हिंदुविरोधी कारवाया चालतात, तसेच त्याविरोधात विखारी प्रसारही केला जातो. असे असतांना त्यांवर बंदी घालण्याचे धारिष्ट्य पोलीस दाखवतील का ?

भारतातील कोरोना लसीवर विश्‍वास नसेल, तर मुसलमानांनी पाकिस्तानात जावे ! – संगीत सोम, आमदार, भाजप, उत्तरप्रदेश

ज्या मुसलमानांना देशात निर्माण करण्यात आलेल्या कोरोनावरील प्रतिबंधात्मक लसीवर विश्‍वास नसेल, त्यांनी पाकिस्तानात जावे, असे विधान भाजपचे आमदार संगीत सोम यांनी केले आहे.

राजस्थानमध्ये दोघा उपदंडाधिकार्‍यांना लाच घेतांना अटक

काँग्रेसच्या राज्यातील प्रशासकीय अधिकार्‍यांची लाचखोरी ! याला काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे का ?, असा प्रश्‍न जनतेच्या मनात उत्पन्न होतो !