पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी निर्माण केलेला वारसा जतन करणे आवश्यक !
आपण अहिल्याबाईंनी उभारलेली मंदिरे, विहिरी, कुंड, तलाव यांची देखभाल केली, तर एक शासक कसा असावा, हे येणार्या पिढीला शिकायला मिळेल. आम्ही हा इतिहास येणार्या पिढीला सांगितला नाही, तर आपली संस्कृती आपण गमावून बसू.