
सत्पुरुषांचा राग लोकांचे दोष नाहीसे व्हावे, यासाठी असतो. वाईट सवयी आत्मसुखाचा नाश करतात; म्हणून संत सतत दोष दाखवून लोकांना समुपदेश करत असतात. सामान्य माणसाने दुसरा माणूस त्याच पद्धतीने का वागतो ?, हे त्याच्या दृष्टीकोनातून पहावे, म्हणजे दोष दिसणार नाहीत. आपण स्वतः दोषातून मुक्त झाल्याविना दुसर्यांचे दोष दाखवू नयेत. आपण प्रथम रागालोभातून मुक्त व्हावे, मग इतरांना तसे व्हायला सांगावे. व्यक्तीगत निकष लावून जगाकडे किंवा दुसर्यांकडे पाहू नये. त्याने आपलीच हानी होते. समाधान हीच श्रीमंती आहे. ती संतांकडून घ्यावी. असमाधान हेच दारिद्र्य !
– वि. श्री. काकडे (साभार : ग्रंथ ‘चिंतन’)