
‘साम्यवादाचा हा प्रयोग आमच्या देशात झाला, ही आम्हा लोकांची एक केविलवाणी शोकांतिका आहे’, असे उद्गार रशियाचे मिखाईल गोर्बाचेव्ह आणि बोरिस येल्तसिन यांनी काढले. विषमता ही नष्ट होणारी वस्तू नाही, हेच या घटनेने सिद्ध केले आहे. विषमता स्वीकारणे जर अपरिहार्यच असेल, तर उद्योग व्यवसायाचे विकेंद्रीकरण करणारी वर्णव्यवस्था स्वीकारणेच उपयुक्त ठरते. ती मुळात जन्माधिष्ठित आहे; म्हणूनच केवळ त्याज्य मानणे इष्ट नाही.
संपूर्ण समता असलेला समाज निर्माण करण्यासाठी साम्यवादी विचारसरणी स्वीकारली गेली. त्यासाठी क्रांती घडवून साम्यवाद्यांनी सर्व शासन स्वतःच्या पद्धतीप्रमाणे निरंकुशपणे चालवले. शासनाचे निष्ठूर आदेश न मानणार्यांचे निर्घृणपणे शिरकाण केले.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती
(साभार : ‘मनुस्मृती भूमिका’ या ग्रंथातून)
सर्वदा अन्यायाने वागणार्यांशी, अत्याचार आणि अतिक्रमण हेच ज्याचे धोरण असते, त्यांच्याशी न्यायनीतीने वागणे, म्हणजे त्याला अधिक उन्मत्त होण्याची संधी देणे होय !
– प.पू. स्वामी वरदानंद भारती