हिजाब परिधान करण्याची मागणी आणि त्या विरोधामागील राष्ट्रद्रोही षड्यंत्र !

‘शाळेत विद्यार्थ्यांना एक समान गणवेश असावा कि नाही ?’, या गोष्टीला वादाचे स्वरूप देऊन त्याला हिजाबपर्यंत मर्यादित करण्यात आले आहे. हिजाबचे कारण पुढे करून अराजक निर्माण करू पहाणार्‍या धर्मांध संघटनांवर बंदी घाला !

महाराष्ट्रात हिजाब परिधान करणार्‍या महिलांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ !

स्वतःचे वेगळे अस्तित्व जपण्यासाठी, तसेच सरकारी यंत्रणांवर दबाव आणण्यासाठी धर्मांध कशा प्रकारे हालचाली करतात, हे यातून दिसून येते. अशांवर आळा घालण्यासाठी समान नागरी कायदा आवश्यक !

निर्धारित ध्वनीपेक्षा मोठ्या आवाजात आरती करणार्‍या बेंगळुरू येथील काही मंदिरांना आवाज न्यून करण्याची धर्मादाय विभागाची नोटीस !

मंदिरांना नोटीस बजावणार्‍या धर्मादाय विभागाने मशिदींना नोटीस बजावली नाही, हे लक्षात घ्या !

(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना संरक्षण द्या !’

हिजाब प्रकरणी इस्लामी देशांच्या संघटनेची मागणी
भारतातील अंतर्गत प्रश्‍नात अशा संघटनांनी नाक खुपसू नये, असे भारताने ठणकावले पाहिजे !

(म्हणे) ‘गणवेशाच्या रंगाचा हिजाब वापरण्याची अनुमती द्या !’  

आम्ही केवळ कर्नाटक सरकारच्या आदेशाला आव्हान दिलेले नाही, तर गणवेशाच्या रंगाचाच हिजाब वापरण्याची अनुमती आम्हाला मिळावी, असा सकारात्मक आदेश देण्याची विनंती करत आहोत, अशी मागणी कर्नाटक उच्च न्यायालयात मुसलमान विद्यार्थिनींनी केली आहे.

शरीयतमध्ये महिलांना सार्वजनिक ठिकाणी बोलण्याचा अधिकार नसतांना मुलीने ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा कशा दिल्या ?

आरिफ महंमद खान हे मुसलमान विचारवंत आणि अभ्यासक आहेत. त्यांचे विचार भारतातील ढोंगी निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी यांना पचनी पडणे अशक्य आहे, हे लक्षात घ्या !

जमावबंदीचा आदेश झुगारून हिजाबच्या समर्थनार्थ मोर्चे !

गृहराज्यमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी ‘अन्य राज्यातील हिजाबचे सूत्र आपल्या राज्यात नको’, असे सांगितले असतांनाही हे मोर्चे काढले जात आहेत. त्यामुळे गृहमंत्रालय या मोर्चेकर्‍यांवर काय कारवाई करणार आहे ?

महाराष्ट्रात हिजाबला समर्थन असल्याचे दाखवण्यासाठी दैनिक ‘लोकसत्ता’कडून कर्नाटकमधील छायाचित्र वापरून दिशाभूल !

चुकीची माहिती देणारी पत्रकारिता समाजहित काय साधणार ? हा हिंदुविरोधी अजेंडा राबवण्याचा प्रकार आहे का ? याची चौकशी व्हायला हवी !

मुसलमान आणि ख्रिस्ती पूर्वज हिंदूच!

वर्ष २००८ मधील आंध्रप्रदेश शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या एका अहवालात म्हटले होते, ‘भारतातील ८५ टक्के मुसलमान आणि ९८ टक्के ख्रिस्ती यांचे पूर्वज हिंदूच असल्याचे दिसून येते.

कुराणमध्ये ‘हिजाब’चा उल्लेख नसून मुसलमान महिलांना तो अनिवार्य करणे, हे त्यांच्या प्रगतीला बाधक ! – राज्यपाल आरिफ महंमद खान, केरळ

हिजाबच्या माध्यमातून सरकार आणि समाज अस्थिर करण्याचा प्रयत्न सरकारने वेळीच हाणून पाडायला हवा !