‘गाना’ आणि ‘हंगामा’ आस्थापनांनी ‘सर तन से जुदा’ गाणे हटवले !

उदयपूर येथे कन्हैयालाल यांची हत्या याच घोषणेच्या नावाखाली झाली होती. हिंदु जनजागृती समितीने हे गाणे हटवण्यासाठी ऑनलाईन अभियान राबवले होते.

मुंबईतील साखळी बाँबस्फोटातील दोषींच्या फाशीच्या शिक्षेवरील निर्णय १६ वर्षांनंतरही प्रलंबित !

मुंबईत लोकलमध्ये ११ जुलै २००६ या दिवशी झालेल्या साखळी बाँबस्फोटाला १६ वर्षे झाली ! मुंबई सत्र न्यायालयाने १३ दोषींपैकी ५ जणांना फाशीची शिक्षा दिली; मात्र मुंबई उच्च न्यायालयात अद्याप या शिक्षेवरील निर्णय घेण्यात आलेला नाही.

आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंदवण्यासाठी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाकडून पोलीस आयुक्तांना नोटीस !

‘आरे वाचवा’ आंदोलनात लहान मुलांना सहभागी करून घेतल्याप्रकरणी राष्ट्रीय बाल अधिकार आयोगाने शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा नोंद करावा, यासाठी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना नोटीस पाठवली आहे.

राष्ट्रपतीपदासाठी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देण्याची शिवसेनेच्या खासदारांची मागणी

शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी मात्र संयुक्त पुरोगामी आघाडीचे उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देण्याची मागणी केली.

डासांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘कॉईल’मुळे कर्करोगाची शक्यता !

डासांचा त्रास होऊ नये, यासाठी ‘मॉस्क्यूटो रिपेलेंट कॉईल’, डास पळवण्यासाठीची उदबत्ती, ‘इलेक्ट्रिक रिफिल’ यंत्र आदींचा वापर केला जातो. या सर्वांचा धूर फुफ्फुसांना हानी पोचवू शकतो. यामुळे कर्करोग होऊ शकतो !

विधीमंडळाच्या सचिवांकडून शिवसेनेच्या ५३ आमदारांना नोटीस !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटातील ३९ आणि उद्धव ठाकरे यांच्या गटातील १४ अशा शिवसेनेच्या ५३ आमदारांना विधीमंडळाच्या सचिवांकडून ‘कारणे दाखवा’ नोटीस देण्यात आली आहे.

ईदच्या दिवशी गायींची हत्या होऊ देऊ नका ! – अधिवक्ता राहुल नार्वेकर, अध्यक्ष, विधानसभा

विधानसभा अध्यक्षांचा निर्णय अभिनंदनीयच आहे; परंतु केवळ ईदच्या दिवशीच नव्हे, तर राज्यात नियमितपणे मोठ्या प्रमाणात गोहत्या चालू आहेत. विधानसभा अध्यक्षांनी गोहत्या बंदी कायद्याचे कठोर पालन करण्यास सांगावे !

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची माहिती सर्वाेच्च न्यायालयात सादर ! – राज्य निवडणूक आयोग

राज्यात होणार्‍या ग्रामपंचायत, नगर परिषद आणि नगर पंचायत यांच्या निवडणुकीची सविस्तर माहिती राज्य निवडणूक आयोगाने ८ जुलै या दिवशी सर्वाेच्च न्यायालयात सादर केली आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाच्या एका अधिकार्‍यांनी दिली.

स्वत:च्या प्रवासासाठी दिला जाणारा विशेष राजशिष्टाचार मुख्यमंत्र्यांनी नाकारला !

‘हे सर्वसामान्यांचे शासन असून महनीय व्यक्तींपेक्षा सर्वसामान्य नागरिकांना प्राधान्य द्यावे’, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

कॉ. पानसरे हत्या प्रकरणाचे अन्वेषण आतंकवादविरोधी पथकाकडे वर्ग करण्याची मागणी

कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचे ‘एस्.आय.टी.’कडे असलेले अन्वेषण ‘एटीएस्’कडे वर्ग करण्याची मागणी कॉ. पानसरे यांच्या नातेवाइकांनी मुंबई उच्च न्यायालयात केली. यावर न्यायालयाने राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत.