‘फ्लेमिंगो’च्या १२ पैकी १० लोखंडी प्रतिकृतींची चोरी !

खाडीच्या किनारी ‘फ्लेमिंगो’ (पक्षी) आढळतात. त्यांचे शहरातील वास्तव्य लक्षात येण्यासाठी महापालिकेने ‘फ्लेमिंगो’च्या १२ लोखंडी प्रतिकृती सिद्ध केल्या होत्या; पण त्यातील १० प्रतिकृती चोरीला गेल्या आहेत.

ठाणे येथील ६६ नगरसेवक शिंदे गटात सहभागी

ठाणे महानगरपालिकेतील शिवसेनेच्या ६७ नगरसेवकांपैकी तब्बल ६६ नगरसेवक एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि माजी महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश आहे.

पक्षाच्या घटनेत हिंदुत्वाचा उल्लेख नसल्यावरून काँग्रेसचे सरचिटणीस सचिन सावंत यांनी भाजप आणि शिवसेना यांना हिणवले !

काँग्रेसने जन्माला घातलेली तथाकथित धर्मनिरपेक्षता आणि सर्वधर्मसमभाव यांचा त्याग करून हिंदुत्वाचा पुरस्कार केल्यास हिंदुत्वनिष्ठ पक्षांना हिणवणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांची तोंडे आपोआप बंद होतील !

राज्यात २० जुलै या दिवशी शिष्यवृत्ती परीक्षा !

पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी राज्यातून ४ लाख १७ सहस्र ८९४, तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी ३ लाख ३ सहस्र ६९७ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा परिषदेने सर्व सिद्धता पूर्ण केली आहे.

एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला !

मंत्रालयातील ६ व्या मजल्यावर येऊन एकनाथ शिंदे यांनी ७ जुलै या दिवशी मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचा हात धरून त्यांना मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसवले.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात करणी सेनेची मुंबई पोलिसांत तक्रार प्रविष्ट

‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये हिंदु देवतेच्या वेशातील एका स्त्रीला सिगारेट ओढतांना दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या माहितीपटाच्या विज्ञापनाचे भित्तीपत्रक आणि माहितीपट यांवर बंदी घालण्यात यावी.

लोकसभेतील शिवसेनेच्या प्रतोदपदावरून खासदार भावना गवळी यांना हटवले !

भावना गवळी यांना प्रतोदपदावरून काढून त्यांच्या जागी शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार !

अखिलेश चौबे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या माहितीपटाचा ‘प्रोमो’ मागील ३ दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या माहितीपटामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत.

मुंबई महापालिकेच्या मंडईमधील दुर्घटनेतील आरोपीवर कारवाई करण्यास आयुक्तांचा नकार !

माझगाव येथील बाबू गेनू मंडईची इमारत कोसळून ६१ जण मृत्यूमुखी पडले होते. ही दुर्घटना होऊन ९ वर्षे उलटूनही आरोपी असलेल्या महापालिकेच्या कार्यकारी अभियंत्यावर फौजदारी कारवाई करण्यास पालिकेच्या आयुक्तांनी नकार दिला.

‘काली’ माहितीपटातील भित्तीपत्रकाच्या विरोधात हिंदु जनजागृती समितीकडून ऑनलाइन स्वाक्षरी अभियान

‘काली’ माहितीपटातील भित्तीपत्रकाच्या विरोधात आणि याच्या निर्मात्या लीना मणीमेकलई यांच्यावर कारवाई होण्यासाठी हिंदु जनजागृती समितीकडून ऑनलाइन स्वाक्षरी अभियान राबवण्यात येत आहे.