मुंबई होत आहे मुसलमानबहुल !

  • २० हून अधिक ठिकाणी हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर !

  • मुंबई दंगलीपासून १ सहस्र ३०६ मुंबईकर ठरले आतंकवादाचे बळी !

मुंबई – मुंबईतील मालवणी, ज्ञानेश्वरनगर, इंदिरानगर झोपडपट्टी, शिवाजीनगर, चिता कँप, शिवडी क्रॉस रोड, सेनानगर, लेबर कँप, डॉकयार्ड रोड, जिजामातानगर (वरळी), प्रेमनगर, शास्त्रीनगर (वरळी), नेहरूनगर (कुर्ला), आझमीनगर (राठोडी), कापडबाजार (माहीम), बेहरामपाडा, भारतनगर, दारूखाना, बगीचा वस्ती, गोपीनाथ शिवनेरी कॉ. सोसायटी, संगमगल्ली, चिरागनगर, अंबुजवाडी आदी २० हून अधिक ठिकाणी मागील काही वर्षांपासून मुसलमानांची संख्या झपाट्याने वाढत असून या भागांतील हिंदू अल्पसंख्यांक होण्याच्या मार्गावर आहेत. वर्ष १९९३ च्या दंगलीपासून धर्मांध आणि आतंकवादी यांच्या आक्रमणांमुळे १ सहस्र ३०६ मुंबईकरांचा बळी गेला आहे. लेखक मोहेश कुर्मी यांनी ‘मुंबईकर, जागते रहा’ या पुस्तकामध्ये मागील काही वर्षांत मुंबईमध्ये मुसलमानांची वाढती लोकसंख्या आणि वाढती गुन्हेगारी यांची भीषणता मांडली आहे. सातत्याने होणारी आतंकवादी आक्रमणे पहाता मुंबईमध्ये मुसलमानबहुल भागांत आतंकवाद्यांचे ‘स्लीपर सेल’ कार्यरत असल्याचा धोका संभवतो. भविष्यात मुंबईसह संपूर्ण देशासाठी ही धोक्याची घंटा आहे.

मागील २५ वर्षांत मुलसमानांच्या लोकसंख्येत तिपटीने वाढ !

वर्ष १९९७ मध्ये मुंबईतील मुसलमानांची लोकसंख्या ११ लाख ८६ सहस्र ३५६ इतकी होती. वर्ष २०२२ मध्ये यात तिपटीने वाढ होऊन मुंबईतील लोकसंख्या ३६ लाख इतकी झाल्याचे अनुमान या पुस्तकात देण्यात आले आहे आहे. वर्ष २०२७ पर्यंत मुसलमानांची लोकसंख्या ४१ लाखांपर्यंत पोचण्याची शक्यताही या पुस्तकात वर्तवण्यात आली आहे.

आतंकवाद आणि धर्मांध यांच्या आक्रमणाच्या सावटाखालील मुंबई !

वर्ष १९९३ मधील दंगलीमध्ये ९०० नागरिक मारले गेले. जुलै २००६ मध्ये पश्चिम उपनगरीय रेल्वेच्या ७ स्थानकांवरील बाँबस्फोटांनी २०९, तर २६ नोव्हेंबर २००८ या दिवशी कसाबसह अन्य आतंकवाद्यांनी १९७ मुंबईकरांचा बळी घेतला. १२ ऑगस्ट २०१२ या दिवशी आझाद मैदानात आंदोलनाच्या नावाखाली जमलेल्या सहस्रावधी धर्मांधांनी महिला पोलिसांचा विनयभंग करत पोलिसांना मारहाण आणि जाळपोळ करत धर्मांधांनी हैदोस घातला. यात २ जणांचा बळी जाऊन २ कोटी ७४ लाख रुपयांची हानी झाली. सैनिकांच्या हौतात्म्याचे प्रतीक असलेल्या ‘अमर जवान’ ज्योतीचे स्मारकही धर्मांधाने लाथ मारून तोडले. मुंबईतील धर्मांधांच्या या कारवाया या पुस्तकात मांडण्यात आल्या आहेत.

वर्ष २०२१ पर्यंत मागील १० वर्षांत मुंबईतील मराठी शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या ६७ सहस्र ३३ इतकी घटली आहे. उलट वर्ष २०१९-२० या शैक्षणिक वर्षात मुंबईतील उर्दू शाळांमध्ये ६२ सहस्र ५१६ विद्यार्थी शिकत होते. यावरून मुंबईचे जलद गतीने होत असलेले इस्लामीकरण दिसून येते. बांगलादेशातील मुसलमानांना मुंबईमध्ये घुसवण्याचे रॅकेट, अवैध धंद्यांत मोठ्या प्रमाणात शिरकाव करून मुंबईचे मोठ्या प्रमाणात होत असलेले गुन्हेगारीकरण आदी भीषण समस्या या पुस्तकात दिल्या आहेत.

आसाम आणि त्रिपुरा यांसह पूर्वाेत्तर भारतातील राज्यांनी जे सहन केले, ते मुंबईच्या वाट्याला येऊ नये ! – स्वामी सत्स्वरूपानंद

आसामची एकूण लोकसंख्या आणि घुसखोरांचे प्रमाण याचे गुणोत्तर पुष्कळ मोठे आहे. स्थानिक आणि मूळ आसामी हिंदु नागरिक यांना याचा पुष्कळ त्रास सहन करावा लागला. काश्मिरी हिंदूंचे झाले, तेच आसाममध्येही होत होते. स्लीपर सेल कुठे असतील, हे आपण सांगू शकत नाही. वर्ष १९९३ पासून चालू असलेले बाँबस्फोट अथवा २६/११ चे आतंकवादी आक्रमण असो, या सर्वांच्या मागे अवैध घुसखोरीच होती. मुंबईकरांनी वेळीच जागे होण्याची आवश्यकता आहे. आसाम, त्रिपुरासह पूर्वाेत्तर भारतातील राज्यांनी जे सहन केले, ते मुंबईच्या वाट्याला येऊ नये.

संपादकीय भूमिका 

  • हिंदूबहुल महाराष्ट्राची राजधानी असणार्‍या मुंबईसाठी ही धोक्याची घंटा नव्हे का ? याचा सर्वच हिंदूंनी गांभीर्याने विचार करावा !