‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’च्या माध्यमातून घराजवळ आरोग्य सुविधा देण्यात येईल ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

राज्याची ग्रामीण आरोग्ययंत्रणा बळकट करण्याला आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. त्यासाठी आरोग्यक्षेत्रासाठी दुप्पट निधी देण्यात येईल

समांतर अर्थव्यवस्था निर्माण करणारी हलाल परिषद सरकारने होऊ देऊ नये ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

मुंबईत होणार्‍या हलाल परिषदेला समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी जोरदार विरोध दर्शवला आहे.

शासकीय कार्यालये, शाळा-महाविद्यालये आदी ठिकाणी दूरभाषवर बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ने अभिवादन करण्याचा आदेश !

देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून सर्वच शासकीय-निमशासकीय आदी ठिकाणी अभिवादन करतांना, तसेच दूरभाष आणि भ्रमणभाष यांवर सहकारी अधिकारी, कर्मचारी यांच्याशी बोलतांना ‘हॅलो’ऐवजी ‘वन्दे मातरम्’ म्हणण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाकडून काढण्यात आला आहे.

बलपूर्वक होणार्‍या धर्मांतराला महाराष्ट्र सरकारने प्रतिबंध घालावा ! – मंगलप्रभात लोढा, पर्यटनमंत्री

बलपूर्वक होणार्‍या धर्मांतराच्या विरोधात उत्तरप्रदेश आणि मध्यप्रदेश यांनी योग्य पाऊल उचलले आहे. महाराष्ट्र सरकारनेही याला प्रतिबंध घालावा, असे आवाहन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निनावी दूरध्वनीद्वारे जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. स्फोट घडवून एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात  आल्याची माहितीही गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून अन्वेषण चालू आहे.

शिंदे गटात सहभागी होत नसल्याने माजी नगरसेवकाला ठार मारण्याची पोलीस उपायुक्तांची धमकी !

राजन विचारे यांनी सांगितले की, ठाणे, कल्याण, नवी मुंबई येथे अशा प्रकारे पोलिसांच्या माध्यमातून शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांना खोट्या गुन्ह्यांत अडकवण्याची, तसेच प्रत्यक्ष गुन्हे नोंद करून शिंदे गटात दबाव आणला जात आहे.

कांदिवली (मुंबई) येथे गोळीबारात १ जण ठार !

कांदिवलीमध्ये लालजीपाडा येथे ३० सप्टेंबरच्या मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या २ व्यक्तींनी केलेल्या गोळीबारामध्ये १ जण ठार झाला असून ३ जण घायाळ झाले आहेत. परस्पर वादातून गोळीबार झाल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

लव्ह जिहादला बळी पडलेल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी राज्यशासन अधिवक्ता नियुक्त करणार !

विवाहानंतर हिंदु धर्मीय पत्नी इस्लामप्रमाणे आचरण करत नसल्यामुळे चेंबूर येथील इक्बाल महमंद शेख या मुसलमान युवकाने तिची भर रस्त्यामध्ये गळा चिरून हत्या केली. भाजपच्या उपप्रदेशाध्यक्षा सौ. चित्रा वाघ यांनी ३० सप्टेंबर या दिवशी चेंबूर येथे जाऊन हत्या झालेल्या विवाहितेच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

गोंगाटात आराधना करणे शक्य नसल्याने गरब्यासाठी आधुनिक ध्वनीयंत्रणेची आवश्यकता नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

हिंदूंना धर्मशिक्षण न दिल्यानेच त्यांच्या उत्सवांचे पाश्चात्त्यीकरण झाले आहे  !

मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे कोकेन जप्त !

येथील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर २८ सप्टेंबर या दिवशी मुंबई सीमा शुल्क विभागाच्या हवाई गुप्तचर विभागाच्या अधिकार्‍यांनी ५ कोटी रुपयांचे ४९० ग्रॅम कोकेन जप्त केले.