राज्‍याच्‍या प्रशासनातील आवश्‍यक पदे निश्‍चित करण्‍याच्‍या आकृतीबंधाला विलंब !

मंत्रालयीन प्रशासकीय विभाग आणि त्‍याच्‍या नियंत्रणाखालील विविध प्रमुख शासकीय कार्यालये यांमध्‍ये असलेली अतिरिक्‍त पदे निश्‍चित करण्‍यासाठी प्रत्‍येक विभागाने आकृतीबंध सादर करण्‍याच्‍या सूचना प्रशासनाकडून देण्‍यात आल्‍या आहेत.

दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झाल्‍याचा आरोप निराधार ! – चौकशी समिती

मुंबईतील पवई भारतीय तंत्रज्ञान संस्‍थेमध्‍ये शिकणार्‍या दर्शन सोळंकी याची आत्‍महत्‍या जातीभेदामुळे झालेली नाही. शैक्षणिक कामगिरी हे दर्शन याच्‍या आत्‍महत्‍येचे कारण असल्‍याचा अहवाल चौकशी समितीने सादर केला आहे.

जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापाव १३ व्‍या स्‍थानी !  

येथील रस्‍त्‍यारस्‍त्‍यांवर मिळणार्‍या वडापावला जागतिक मान्‍यता मिळाली आहे. जगातील ५० सर्वोत्तम ‘सँडविच’च्‍या सूचीत वडापावला १३ व्‍या क्रमांकावर स्‍थान मिळाले आहे. ‘टेस्‍ट अ‍ॅटलस’ या ‘जागतिक फूड ट्रॅव्‍हल गाईड’ने हे सर्वेक्षण केले आहे.

एस्.टी. महामंडळात येणार ८ सहस्र वातानुकूलित गाड्या ! – शेखर चन्‍ने, व्‍यवस्‍थापकीय संचालक, राज्‍य मार्ग परिवहन महामंडळ

‘खासगी ट्रॅव्‍हल्‍स’प्रमाणे दर्जेदार सुविधा देण्‍यासाठी एस्.टी. महामंडळ करणार प्रयत्न !

१४ ते १८ मार्च या कालावधीत शिवतीर्थावर ‘जाणता राजा’ महानाट्याचे सादरीकरण !

छत्रपती शिवाजी महाराजांच्‍या जन्‍मापूर्वीचा महाराष्‍ट्र ते छत्रपतींचा राज्‍याभिषेक या दोन महत्त्वाच्‍या घटनांमधील हे महानाट्य आहे. ८० फूट लांब आणि ४० फूट रुंद असलेल्‍या प्रशस्‍त रंगमंचावर हत्ती, घोडे आणि २०० कलाकारांसह हे महानाट्य साकारले जाईल.

राज्‍यातील १० जिल्‍ह्यांतील प्रत्‍येकी ५० अल्‍पसंख्‍यांकांना शासकीय निधीतून देण्‍यात येणार पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण !

देशात होणार्‍या आतंकवादी कारवाया स्‍थानिक धर्मांध मुसलमानांच्‍या साहाय्‍याने झाल्‍याचा इतिहास आहे. भविष्‍यात धार्मिक दंगल झाल्‍यास या योजनेचा उपयोग देशविरोधी कारवायांसाठी होणार नाही, याची खात्री कोण देणार ?

‘जंगली रमी’ या ऑनलाईन जुगारात महाराष्‍ट्रासह देशभरात वाढ !

यायालयाने वर्ष २०१५ मध्‍ये या खेळाला कौशल्‍यावर आधारित म्‍हटले असले, तरी सद्यस्‍थितीत त्‍याला मोठ्या जुगाराचे स्‍वरूप प्राप्‍त झाले आहे. त्‍यामुळे याविषयी केंद्र सरकारने धोरणात्‍मक निर्णय घेणे आवश्‍यक आहे.

मुंबई येथे बोगस आधुनिक वैद्य असणारा धर्मांध अटकेत !

वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र नसतांनाही रुग्णांवर उपचार करणारा बोगस आधुनिक वैद्य इस्लाम हबीब सिद्धीकी याला मानखुर्द येथून अटक करण्यात आली. त्याच्यावर गुन्हाही नोंद करण्यात आला आहे.

‘ट्विटर’ने ‘टिक’ची (खुणेची) संकल्पना चोरली !

नामांकित व्यक्ती किंवा प्रमुख व्यक्ती यांच्या ‘ट्विटर’ खात्यासाठीच्या ‘टिक’ म्हणजेच खुणेच्या सेवेची संकल्पना चोरली आहे, असा आरोप पत्रकार रूपेश सिंह यांनी केला आहे .

मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था : २० मार्चला मुंबईत जनआक्रोश आंदोलन

जनआक्रोश आंदोलन आता गावागावांत आणि वाडीवाडीत वणव्यासारखे पेट घेत आहे. मुंबई-गोवा महामार्गाची इतकी वर्ष दुरवस्था झाली आहे की, त्याकडे सरकार लक्ष देत नाही. हे आम्ही लोकांना पटवून सांगत आहोत.