मोशी (पिंपरी) येथील जलवाहिनीला गळती; सहस्रो लिटर पाणी वाया !

जलवाहिनीला गळती कशी लागते ? महापालिका प्रशासन वेळोवेळी तिची पडताळणी करत नाही का ?

SC Slams Private Hospitals : अनुदानित खासगी रुग्णालयांकडून गरिबांसाठी खाटा राखीव ठेवण्याच्या आश्‍वासनाला हरताळ !

न्यायालयाने अशा रुग्णालयांना केवळ फटकारून सोडू नये, तर त्यांच्याकडून आश्‍वासनांची आणि नियमांची पूर्ती व्हावी, यासाठी कठोर धोरण राबवण्याचा आदेश द्यावा, असेच सामान्य जनतेला वाटते !

संपादकीय : नक्षलवादाचा नायनाट आवश्यक !

भारताच्या स्वातंत्र्यानंतर कोणत्याही सरकारने आदिवासींच्या हिताकडे विशेष लक्ष दिले नाही. सरकारने आदिवासीबहुल भागांतील लोकांमध्ये विश्वास निर्माण केल्यास नक्षलवाद संपुष्टात आणणे शक्य !

श्री स्वामी समर्थ प्रकटदिनी अक्कलकोटमध्ये सहस्रो भाविकांची गर्दी !

श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी भाविकांनी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, चा जयघोष करत सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले.

शिक्षक स्थानांतर प्रकरणात आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली !

शिक्षकांचे केवळ स्थानांतर करून काय उपयोग ? दुसर्‍या शाळेत गेल्यावर ते त्याच चुका करत रहाणार ! स्थानांतरासमवेत त्यांना अन्य शिक्षा केली, तर त्यांना चुकीची जाणीव होईल.

Haryana School Bus Accident : हरियाणात खासगी शाळेची बस उलटल्याने ६ विद्यार्थ्यांचा मृत्यू, तर १५ मुले घायाळ  

ओव्हरटेक करणे हे अपघाताचे कारण असल्याचे सांगितले जात आहे. ईदनिमित्त सर्व शासकीय कार्यालये आणि शाळांना सुटी असतांनाही खासगी शाळेने सुटी दिली नव्हती.

लोकसभा मतदानदिनी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद रहाणार ?

पुणे लोकसभा मतदारसंघात १३ मे या दिवशी मतदान होणार आहे. त्याकरता पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्‍यांना १२ आणि १३ मे या दोन्ही दिवशी निवडणुकीचे काम देण्यात येणार आहे.

अधिकचे पाणी घेऊनही पुणे शहरांतील काही भागांत पाणीपुरवठा विस्कळीत !

स्वातंत्र्याच्या ७६ वर्षांनंतरही पाण्याच्या मूलभूत समस्येसाठी नागरिकांना खर्च करावे लागणे हे सर्वपक्षीय शासनकर्ते आणि प्रशासन यांना लज्जास्पद !

पुणे येथील १०० खासगी रुग्णालयांचे परवाना नूतनीकरणच नाही !

रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणचे परवाना नूतनीकरण न हाेणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्यासारखेच आहे !

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या बसमध्ये ‘कॅशलेस प्रणाली’ बंद !

अनेक वाहकांकडे असलेल्या यंत्रात ‘नेटवर्क’ समस्येमुळे ही यंत्रणा प्रतिसाद देत नाही. त्यामुळे सर्वच ‘पी.एम्.टी.’च्या बसमध्ये सध्यातरी ‘कॅशलेस प्रणाली’ बंदच असल्याने वाहक रोख पैसे घेऊनच प्रवाशांना तिकीट देतात.