पुणे येथील १०० खासगी रुग्णालयांचे परवाना नूतनीकरणच नाही !

पुणे – येथील अनुमाने १०० हून अधिक खासगी रुग्णालये विनाअनुमती चालू आहेत. रुग्णालयांच्या परवान्याची मुदत ३१ मार्चला संपली असून त्यांनी नूतनीकरण केलेले नाही. महापालिकेच्या हद्दीतील ८४० खासगी रुग्णालयांपैकी ४१० रुग्णालयांच्या परवान्याचे नूतनीकरण होणे आवश्यक होते; मात्र ४१० पैकी केवळ ३१० रुग्णालयांनी नूतनीकरण केले असून १०० रुग्णालयांचे नूतनीकरण शेष आहे. महापालिका नूतनीकरण न करणार्‍या रुग्णालयांवर दंडात्मक कारवाई करते; मात्र दरमहा १०० रुपये दंड केला जातो.

  • महापालिकेचे आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार – रुग्णालयांच्या परवान्याचे अन्वेषण करण्याची मोहीम लवकरच हाती घेऊ !
  • हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडिया’च्या पुणे शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील – परवाना नूतनीकरणासाठी अग्निशमन दल आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची प्रमाणपत्रे आवश्यक असतात; मात्र ती प्रक्रिया वेळखाऊ असल्याने विलंब होत आहे.

संपादकीय भूमिका :

रुग्णालयांसारख्या संवेदनशील ठिकाणचे परवाना नूतनीकरण न हाेणे म्हणजे रुग्णांच्या जिवाशी खेळ केल्यासारखेच आहे !