अक्कलकोट – श्री स्वामी समर्थ महाराज प्रकटदिनाच्या निमित्ताने १० एप्रिल या दिवशी भाविकांनी ‘अनंत कोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय’, चा जयघोष करत सहस्रो भाविकांनी दर्शन घेतले. अनेकांनी श्री स्वामी समर्थ मंदिर ते समाधी मठापर्यंत दंडवत घातले. ९ एप्रिलपासूनच स्वामी भक्तांमुळे अक्कलकोट नगरी फुलून गेली होती. दुसरीकडे नगरपालिकेकडून शहरातील मुख्य रस्त्यावर स्वच्छता न ठेवल्याने, तसेच झाडलोट न केल्याने स्वामीभक्तांची गैरसोय झाली. अनेक भक्तांना या अस्वच्छ रस्त्यावरूनच दंडवत घालावा लागला. रात्री मुख्य रस्त्यावर दिवे नसल्याने त्याचा त्रासही भक्तांना सहन करावा लागला. (यासाठी प्रशासनातील उत्तरदायींची चौकशी करून कारवाई होणे आवश्यक ! – संपादक)